'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याचा वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Sita Lioness with Akbar Lion :  'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याने हिंदुंचा अवमान झाल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदने कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 22, 2024, 09:19 PM IST
'सीता' सिंहिणीला 'अकबर' सिंहासोबत ठेवल्याचा वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय  title=

Sita Lioness with Akbar Lion : पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीचं नाव बदलण्याचे आदेश दिले आहे. हा संपूर्ण वाद सुरु झाला तो सिंहाचं नाव अकबर (Akbar lion) आणि सिंहिणीचा नाव सीता ठेवण्यावरुन (Sita Lioness). यावर हिंदुंचा अवमान झाल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदने  (VHP) कोर्टात धाव घेतली होती. विहिपने कोर्टात याविरोधात याचिका दाखल केली.

याप्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश सौगत भट्टाचार्य यांनी राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच खडसावलं. आपल्या पाळीव प्राण्यांची नावं हिंदू देवी-देवता किंवा मुस्लिम पैगंबर यांच्या नावावर ठेवाल का? देशातील एक मोठा वर्ग सीताची पूजा करतो. तर अकबर हा एक मुगल सम्राट होता, असं न्यायाधीश सौगत भट्टाचार्य यांनी सांगितलं. आपण एखाद्या पाळीव प्राण्याचं नाव रवींद्रनात टॅगोर यांच्या नावावरुन ठेवण्याचा विचार तरी करु शकतो का असं सांगत न्यायाधीशांनी सिंहाचं नाव अकबर आणि सिंहिणीचं नाव सीता ठेवण्याचा आपल्याला काहीही अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. 

असा सुरु झाला वाद
त्रिपुरातील सिपाहीजाला प्राणी संग्रहालायतून आठ प्राणी पश्चिम बंगालमधल्या सिलिगुजी सफारी पार्कमध्ये आणण्यात आले. यात अकबर आणि सीता नावाच्या सिंह-सिंहिणीचाही समावेश होता. याप्रकरणी 16 फेब्रुवारीला विश्व हिंदू परिषदेने कोलकाता हायकोर्टात धाव घेतली. हिंदुचा अवमान केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. अकबर मुगल सम्राट होता तर सीतामातेला हिंदू धर्मात पूजलं जातं. विहिपने सिंहिणीचं नाव बदलण्याची मागणी करत सिंह आणि सिंहिणीला वेगळं ठेवण्याची मागणी केली होती. 

बंगाल सरकारने काय म्हटलं?
हायकोर्टात सुनावणी दरम्यान बंगाल सरकारच्या वकिलांनी यावर युक्तीवाद केला. सिंह आणि सिंहिण त्रिपुरा प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले होते, त्यांना बंगाल सरकारकडून नावं देण्यात आलेली नाहीत. पण विहिपने सिंह-सिंहिणी त्रिपुरातून आणले असले तरी पश्चिम बंगाल सरकारने त्यांना नावं दिल्याचा दावा केला आहे. 

कोर्टाने काय निकाल दिला?
या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायाधीश भट्टाचार्य यांनी एखाद्या प्राण्याला देवी-देवता, पौराणिक पात्र किंवा स्वतंत्र्यात सेनानी यांची नावं देणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारला. कोलकाता हायकोर्टाने सिंह-सिंहिणीचं नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत. सीता आणि अकबर नाव ठेऊन विनाकारण वाद का निर्माण करायचा असंही कोर्टाने म्हटलंय. आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने सिंह-सिंहणीची नावं बदलण्याचं मान्य केलं आहे.