नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपलीय.
गुजरात निवडणुकांमुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलंय शिवाय ते केवळ १० दिवसांचं करण्यात आलंय. जीएसटी, नोटाबंदी यावर विरोधकांना उत्तरं द्यावी लागू नयेत यासाठी सरकारनं अधिवेशनाचा कालावधी घटवल्याची टीका काँग्रेसनं केलीय.
मात्र विधानसभा निवडणुकांसाठी संसदीय अधिवेशनाच्या तारखा बदलण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा दावा सरकारनं केलाय.
काँग्रेस नेत्यांना गुजरातमध्ये प्रचाराला जायचं नाहीय का? असा सवालही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय.