सत्ता आल्यास EVM वर बंदी घालू, काँग्रेसचा मोठा निर्णय

पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी राजस्थानमधील उदयपूरमध्ये नवसंकल्प चिंतन शिबिराचं (Congress Chintan Shibir) आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: May 15, 2022, 07:16 PM IST
सत्ता आल्यास EVM वर बंदी घालू, काँग्रेसचा मोठा निर्णय  title=

उदयपूर :  काँग्रेसला 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी तसेच पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी राजस्थानमधील उदयपूरमध्ये नवसंकल्प चिंतन शिबिराचं (Chintan Shibir) आयोजन करण्यात आलं होतं. या चिंतन शिबिरात कांग्रेसकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. काँग्रसने घेतलेले हे निर्णय पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतात, असं म्हटलं जात आहे.  (congress navsankalp chitnan shivir evm will be banned if it comes to power party udaipur)

काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरातील महत्वपूर्ण निर्णय 

सत्ता आल्यास EVM वर बंदी घालू असा मोठा निर्णय काँग्रेसनं घेतला. उदयपूरमधील काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरात काँग्रेसनं कात टाकण्याचे संकेत दिले आहेत. पक्षात यापुढे तिकीटवाटपात तरूणांना आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. 

ऑक्टोबरमध्ये देशव्यापी यात्रा

सर्वसामान्य जनतेशी काँग्रेसची नाळ जोडण्यासाठी ऑक्टोबरमध्ये देशव्यापी यात्रा काढण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून ही यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचा या यात्रेतून पक्षसंघटन मजबूत करण्याचं उद्देश असणार आहे. 

एक कुटुंब एक तिकीट 

काँग्रेसने या चिंतन शिबिरात तिकीटवाटपाबाबत निर्णय घेतला. यापुढे एका कुटंबातून एका व्यक्तिलाच उमेदवारी देण्यात येईल, असा हा निर्णय आहे. तसेच एकाच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला पक्षात 5 वर्ष काम केल्यानंतरच उमेदवारी तसेच पक्षांतर्गत जबाबदारी देण्यात येईल.