कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांना आक्षेप

कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधले मतभेद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत.

Updated: Jul 7, 2018, 06:44 PM IST
कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांना आक्षेप title=

बंगळुरू : कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधले मतभेद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींनी सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एचके पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. एचडी पाटील यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिलं आहे. यामध्ये पाटील यांनी अल्पसंख्याक आणि राज्याच्या उत्तरेतल्या क्षेत्रासाठी निधीची मागणी केली आहे. याचबरोबर पाटील यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना पत्र लिहून समन्वय समितीची आपत्कालिन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

२०१८ सालच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाला जिंकवण्याला अल्पसंख्याक समाज जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी बजेटमध्ये खास कार्यक्रमाची घोषणा केली पाहिजे होती. बजेटच्या चर्चेवर उत्तर देताना कुमारस्वामींनी अशी घोषणा करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. उत्तर कर्नाटकमधल्या नागरिकांना या बजेटकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण या नागरिकांची निराशा झाल्याचं पाटील म्हणाले.