कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

Updated: Nov 21, 2017, 03:42 PM IST
कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका title=

नवी दिल्ली : गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या साडे तीन वर्षात सरकार नव्हे निवडणूक  लढण्याची यंत्रणा तयार केल्याचा सणसणीत टोला हाणलाय. निवडणूक आयोगानं निवडणूक काळात पंतप्रधानांना सरकारी यंत्रणेवर खर्च करण्याची परवानगी दिली आहे. 

पण त्यावेळी  पंतप्रधान सारा वेळ निवडणूक प्रचारातच व्यस्त होतील याची कल्पना आयोगाला नव्हती, अशा खरपूस शब्दात राज्यसभेतले विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी मोदींच्या प्रचार दौ-यांचा समाचार घेतलाय. 

शिवाय पंतप्रधान मोदींच्या प्रचार दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून किती खर्च झाला. या प्रश्नाचं उत्तर हिवाळी अधिवेशनात विचारू असंही आझाद यांनी म्हटलंय.  शिवाय  ज्या राज्यात निवडणूका त्या राज्यात संपूर्ण मंत्रिमंडळ स्थलांतरित होतं. त्यामुळे दिल्लीतला कारभार ठप्प होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.