मुंबई : 2019 मध्ये होणाऱ्या निवडणूकीकरता काँग्रेसने महायुतीची ब्लू प्रिट जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी लोकसभा निवडणूक 250 जागांकरता लढणार आहे. या मागचा उद्देश म्हणजे या महायुतीच्या माध्यमातून देशभरात पसरलेली मोदी लाट रोखणे हा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार,काँग्रेस 2014 मध्ये लोकसभेत जिंकलेल्या 44 जागा कुणालाही देणार नाही.
बाकीच्या जागा महायुतीत घेणार असून 224 जागांकडे लक्ष केंद्रीत करणार आहेत. यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा देखील समावेश आहे. इथे भाजपविरूद्ध काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. याप्रकारे काँग्रेस जवळपास 250 जागांकरता रणनीति आखत आहेत. तसेच जर युतीत काही अडचणी आल्या स्थानिक पक्षांना विधानसभेत जास्त जागा देवून लोकसभा 2019 च्या निकालाकरता काहीही करणार