Rahul Gandhi Sonia Gandhi Video: राहुल गांधी. विरोधकांसाठी 'पप्पू' पण, सध्या देशातच्या तरुणाईसाठी 'हिरो'. देशाच्या राजकारणात एक नवी पहाट आणू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) राहुल गांधी यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रा सुरु केली. विरोधकांच्या मते अपयशी ठरेल अशी ही यात्रा पाहता पाहता त्यांच्याच मनात भीती निर्माण करुन गेली. तब्बल 3000 किमीचा प्रवास पूर्ण करत आता हीच भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पोहोचली आहे. 3 जानेवारीपासून यात्रेचा पुढील प्रवास उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) रोखानं सुरु होणार आहे. राहुल यांना तेव्हा प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka gandhi) यांची साथ लाभणार आहे. पण, त्याआधी राहुल गांधी त्यांच्या कुटुंबासोबत काही खास क्षण व्यतीत करत आहेत.
नुकत्याच साजरा झालेल्या काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पण, त्यातही एका व्हिडीओनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. अनेकांनी तर हा व्हिडीओ कित्येकदा पाहिला याचाही नेम नाही.
व्हिडीओमध्ये राहुल गांधी त्यांच्या आईसोबत गप्पांमध्ये रमलेले दिसत आहेत. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे त्याच्या आईला सतावतं, अगदी त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा त्यांच्या आईला सतावताना दिसत आहेत. हे पाहून तिथे असणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनाही हसू आवरता आलेलं नाही. राजकारणामध्ये तसुभरही रस नसणाऱ्यांनाही हा व्हिडीओ भावल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi had a joyful moment with his mother Sonia Gandhi during the party's 138th Foundation Day celebration event in Delhi pic.twitter.com/tgqBAxY2co
— ANI (@ANI) December 28, 2022
काँग्रेसच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेचा प्रारंभ सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारी येथून झाला होता. गेल्या तीन महिन्यांच्या काळात देशातील बहुतांश राज्यांतून ही यात्रा पुढे आली आहे. सध्या दिल्लीमध्ये असणाऱ्या या यात्रेचा पुढील प्रवास उत्तर प्रदेश रोखानं सुरु होईल. तिथून काश्मीरपर्यंत ही यात्रा 3570 च्या प्रवासानंतर पूर्ण होईल. या यात्रेविषयी अधिक माहितीसाठी https://www.bharatjodoyatra.in/hi/ या लिंकवर क्लिक करा.