मुंबई : जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत आहे. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण या दिवसाची मदत घेतात. प्रेमीयुगुल आजच्या दिवशी अतोनात प्रयत्न करून एकमेकांना भेटतात. भेटण्यासाठी अनेक बहाणे घरी किंवा ऑफिसमध्ये सांगतात. (Shivsena will break legs of couples who celebrating valentines Day ) या सगळ्यांवर करडी नजर असणार आहे ती म्हणजे शिवसेनेची.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा व्हॅलेंटाईन डे ला विरोध आहे. 'बाबू', 'शोना' म्हणत एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी आज सावध राहा. यांना प्रेमी जोडप्यांना शिवसेनेने चेतावणी दिली आहे. महत्वाची म्हणजे शिवसेना कार्यकर्ते भोपाळमध्येही ऍक्टिव झाले आहे. तेथील प्रेमीयुगुलांना चोपण्याची धमकी देण्यात आली आहे.
रविवारी राजधानीतील कालिका शक्तीपीठ मंदिरात शिवसेनेचे कार्यकर्ते काठ्यांची पूजा करताना दिसले. तरुणांना आणि विशेषत: प्रेमीयुगुलांना देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, कुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आढळल्यास त्याचे पाय मोडले जातील.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन डे ला कडाडून विरोध केला आहे. या विरोधाकरता विशेष तयारी देखील केली आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकत्र भेटणाऱ्या कोणत्याही जोडप्यावर त्यांचे पथक कारवाई करणार आहे. व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य देशांचा सण असून पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध केला जाईल, असेही शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना कधीकाळी प्रेमिकांसाठी शत्रू झाली होती. प्रेम दिनाच्या विरोधात शिवसेनेचा रोख काही वर्षांपूर्वी दिसून आला होता. पण आता प्रेम दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला शिवेसेनाचा असा खास विरोध दिसून येत नाही.
मात्र महाराष्ट्रात कोणत्याच शहरात आज शिवसेना संस्कृती संरक्षणासाठी व्हॅलेंटाईन डेचा विरोध करताना दिसत नसली, तरी मध्य प्रदेशातील भोपाळची शिवसेना अजून तरी वेळेनुसार बदलेली दिसत नाही.
व्हॅलेंटाईन डे बद्दल महाराष्ट्रातली शिवसेना बदलली पण भोपाळमधील ही शिवसेना अधिकच आक्रमक झाली असताना दिसून येत आहे.