अहमदाबाद : राज्यसभेच्या गुजरातमध्या निवडणुकीपूर्वी पक्षाची मतं फुटू नयेत, म्हणून बंगळूरूला गेलेल्या काँग्रेसच्या ४४ आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये आणण्यात आलं. काँग्रेसचे चाणक्य म्हणून प्रसिद्ध असणारे अहमद पटेल राज्यसभेसाठी गुजरातमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपनं काँग्रेसचा राजीनामा दिलेले आमदार बलवंत सिंग यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळं तीन जागांसाठी चार उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसच्या सहा आमदारांनी आधीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आणखी उमेदवार फुटू नयेत म्हणून ४४ जणांना दहा दिवसांपूर्वी बंगळुरूला पाठवण्यात आलं होतं. आता उद्या होणाऱ्या मतदानाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.