शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड

आई-वडिलांनंतर शिक्षकांच्या हातातच मुलांचं भविष्य असतं. शिक्षक हे लहान मुलांचे गुरु असतात. मात्र, आता असा एक प्रकार उघडकीस आले आहेत ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 7, 2017, 06:43 PM IST
शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड title=

नवी दिल्ली : आई-वडिलांनंतर शिक्षकांच्या हातातच मुलांचं भविष्य असतं. शिक्षक हे लहान मुलांचे गुरु असतात. मात्र, आता असा एक प्रकार उघडकीस आले आहेत ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे.

आसाममधील मॉडेल शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील फोटोज काढले आणि ते सोशल मीडियात व्हायरल केले होते. या प्रकरणी आरोपी फईझउद्दीन अन्सारी या विकृत शिक्षकाला पोलिसांनी गजाआड केलं आहे. यानंतर आता या शिक्षकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यातील मॉडेल शाळेत फईझउद्दीन हा शिक्षक काम करत होता. मात्र, त्याने शाळेतील विद्यार्थीसोबत अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्यानंतर सोशल मीडियात अपलोड केला. व्हायरल झालेल्या या फोटोत फईझउद्दीन याने शाळकरी मुलीला मिठी मारल्याचे दिसत आहे.

विद्यार्थिनीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आसाम पोलिसांनी फईझउद्दीन अन्सारी या विकृताला अटक केली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फईझउद्दीन अन्सारी या शिक्षकाविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यापूर्वी एका महिलेसोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला रस्त्यात मारहाणही केली होती.