नवी दिल्ली : जर एखाद्या ग्राहकाने 3.5 किलो पिठाचे पॅकेट घेतले किंवा 88 ग्रॅम बिस्किटचे पॅकेट खरेदी केले तर संबधित प्रोडक्ट इतर प्रोडक्टपेक्षा महाग आहे की स्वस्त? याची माहिती काढणे कठीण होते. परंतु पुढील एप्रिल 2022 पासून ग्राहकांना कोणत्याही सामानावरील प्रति एककाची किंमत (युनिट सेल प्राइस)ची माहिती मिळणार आहे.
प्रति एकक विक्री मुल्य छापणे गरजेचे
ग्राहकांच्या खरेदी संबधी निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने कायद्यात सुधारणा केली आहे. ज्याअंतर्गत पॅकेटबंद सामानाच्या पॅकवर प्रति युनिट विक्री मुल्य छापणे गरजेचे असेल.
ग्राहक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, एक किलोग्रॅमपेक्षा जास्त असलेल्या पॅकेटबंद सामान विकणाऱ्या कंपन्यांना एमआरपीसोबतच प्रति किलोग्रॅम किंवा संबधीत एककात 'एकक विक्री मुल्य' छापणे बंधनकारक असणार आहे.
उदा. 2.5 किलो पॅकेटबंद पिठाच्या पॅकेटवर एमआरपीसोबत प्रति किलो एकक विक्री मुल्यसुद्धा छापने आणि दर्शवणे बंधनकारक असेल.
ग्राहकांना फायदा
या निर्णयामुळे ग्राहकांना खरेदीसंबधी निर्णय घेण्यास आणि सामानाची तुलना करण्यास सोपे होणार आहे.