Leaders : चर्चेत असणाऱ्या स्वाती मालीवाल यांचा महिलांसाठी लढा

Success Story : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल (Swati Maliwal).

Updated: Nov 9, 2021, 09:19 AM IST
Leaders : चर्चेत असणाऱ्या स्वाती मालीवाल यांचा महिलांसाठी लढा title=

मुंबई : Success Story : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय. त्यांना पुन्हा एकदा तीन वर्षांसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. याआधी स्वाती मालीवाल यांचा कार्यकाळ दोनदा वाढवण्यात आला आहे. ही तिसरी टर्म आहे.

स्वाती मालीवाल यांनी 2015 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा दिल्लीतील लोकांसाठी त्यांचे नाव नवीन होते. परंतु आता महिलांना सुरक्षित ठेवण्याची आणि महिलांशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर त्यांची तळमळ यामुळे त्याअधिक महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या निःपक्षपातीपणामुळे आज प्रत्येक दिल्लीकर त्यांचे नाव स्मरणात ठेवतात. प्रत्येकवेळी स्वाती मालीवाल आपल्या परीने महिलांवरील अत्याचार आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आल्या आहेत.

'वेश्याव्यवसाय ही समाजाची वृत्ती चुकीची'

महिला आयोगाच्या अध्यक्ष होताच त्यांनी जीबी रोडच्या सर्व दालनांना नोटिसा बजावून आपले मनसुबे दाखवले होते. वेश्यावृत्ती बाबत समाजाचा जो दृष्टीकोण आहे तो निंदाजनक आहे. वेश्याव्यवसाय ही समाजाची वृत्ती चुकीची आहे. जे लैंगिकशोषण करतात तेच बलात्काराचे समर्थन करीत आहेत, असे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्या पुढे सांगतात, वेश्यावृत्ती ही बलात्कारासमान आहे. हा समाजाला लागलेला डाग आहे. शासनाने वेश्याव्यवसायाचे निर्मुलन करण्याची गरज आहे. दर महिन्याला दिल्लीतील जी. बी. रोडमधील रेडलाईट परिसरात कंडोम कथित स्वरुपात वाटण्यात येत आहे. याचा उल्लेख करुन मालीवाल म्हणाल्यात, 6 लाख कंडोम वाटप म्हणजे 6 लाख बलात्कार होय. याला दिल्ली एक प्रकारे मंजुरी देत आहे.

मालीवाल यांनी दिल्लीतील रेडलाईट परिसराची पाहाणी केली. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी तुम्ही जर हा रेडलाईट परिसर बंद केला तर बलात्कार वाढ होईल, असे लोकांनी सांगितल्यावर त्यांनी चीड व्यक्त केली. अशी ज्यांची मानसिकता आहे ती चुकीची आहे. ज्याकाही समस्या आहेत त्या आम्ही राज्य सरकार आणि सामाजिक संस्था तसेच केंद्राच्या सहकार्यातून सोडवू, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले.

न्यायासाठी कठोर भूमिका 

जेथे महिलांना न्याय मिळत नाही तसेच महिलांवरील अत्याचारांवर स्वाती प्रत्येक सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. कधी त्या न्यायासाठी कठोर भूमिका घेत आहेत, तर कधी शांततेत उपोषण करतात. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या जनसंवादात येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारीही त्यांनी अतिशय चोखपणे सांभाळली होती.

स्वाती मालीवाल तळागाळातील लोकांच्या कामासाठी जितक्या सक्रिय आहेत तितक्याच त्या सोशल मीडियावरही कायम आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आग्रा येथे तासनतास उन्हात उभ्या असलेल्या हजारो शाळकरी मुलांवर टीका करण्याव्यतिरिक्त स्वाती मालीवाल यांनी जोरदारपणे मांडलेल्या इतरही अनेक बाबी होत्या.

जनलोकपाल चळवळीच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या कोअर कमिटीच्या त्या सर्वात तरुण सदस्य होत्या. त्यावेळी या समितीच्या इतर सदस्यांमध्ये अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि किरण बेदी यांसारखी मोठी नावे होती, पण स्वाती यांनीही आपले नाव कायम चर्चेत ठेवले आणि त्यांनी चांगले काम केले.

स्वाती मालीवाल यांचा अल्प परिचय

- स्वाती मालीवाल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1984 रोजी गाझियाबादमध्ये झाला. मात्र त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले.
- 2002 मध्ये त्याने एमिटी स्कूल, नोएडा येथून इंटरमिजिएट केले.
- त्यांनी 2006 मध्ये आयपी युनिव्हर्सिटी, दिल्ली येथून माहिती तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.
- महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच त्यांचा समाजसेवेकडे कल होता आणि त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ग्रीनपीस या एनजीओमध्ये प्रवेश घेतला.
- अरविंद केजरीवाल यांच्या 'परिवर्तन' या एनजीओसाठी काम केले. यावेळी त्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि माहितीचा अधिकार याबाबत लोकांना जागरुक केले.
- दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक तक्रार कक्षाच्या प्रमुख म्हणून काम 
- मुख्यमंत्र्यांच्या जनसंवादाला येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
- 2015 मध्ये दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बनवण्यात आले 
- 2018 मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. याआधी मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या आणि इतर काही मागण्यांसाठी दहा दिवसांच्या उपोषणानंतर त्या चर्चेत