यूपीतून मुंबईत येणं होणार आणखी सोपं! 25 नव्या ट्रेन चालविण्याची तयारी

UP Train For Mumbai:  पूर्वोत्तर रेल्वने गोमतीनगरहून गोरखपूरमार्गे पुरी आणि रामनगर (उत्तराखंड) हून वांद्रेपर्यंत नवीन वेळापत्रक तयार करुन बोर्डाला पाठवले आहे. तसेच गोमतीनगर ते टाटानगरच्या वेळापत्रकावर विचार सुरु आहे.3 ट्रेन ऑगस्टपासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या दिवशी देशभरातील 25 ट्रेनना हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. या सर्व ट्रेनना आयआरसीटीसीच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. 

Updated: Jul 30, 2023, 10:45 AM IST
यूपीतून मुंबईत येणं होणार आणखी सोपं! 25 नव्या ट्रेन चालविण्याची तयारी title=

UP Train For Mumbai: आता उत्तर प्रदेशातील नागरिकांना मुंबईत येणं आणखी सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेकडून यूपीच्या तरुणांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पूर्वोत्तर रेल्वने गोमतीनगरहून गोरखपूरमार्गे पुरी आणि रामनगर (उत्तराखंड) हून वांद्रेपर्यंत नवीन वेळापत्रक तयार करुन बोर्डाला पाठवले आहे. तसेच गोमतीनगर ते टाटानगरच्या वेळापत्रकावर विचार सुरु आहे.3 ट्रेन ऑगस्टपासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या दिवशी देशभरातील 25 ट्रेनना हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. या सर्व ट्रेनना आयआरसीटीसीच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. 

एनईआरच्या 3 ट्रेनशिवाय एनएफ रेल्वेने देखील गोरखपूरच्या मार्गे मुंबईसाठी ट्रेन सज्ज केली आहे. ही ट्रेन कटिहार ते मुंबई वाया गोरखपूर अशी चालेल. या सर्व एक्सप्रेस ट्रेन आहेत. लवकरच बोर्डाकडून सर्व ट्रेनचे नंबर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. 

7 जुलैला सिकंदराबादमध्ये झालेल्या आयआरसीटीसीच्या बैठकीत देशातील विविध मार्गांवर 25 नव्या ट्रेन चालविण्याच्या निर्णयावर सहमती देण्यात आली होती. यातील 3 ट्रेन एनई रेल्वेच्या वाट्याला आल्या आहेत. 

प्रस्तावित ट्रेन 

गोमतीनगर- गोरखपूर- पूरी 
गोमतीनगर- गोरखपूर - टाटानगर 
रुद्रपूर् (उत्तराखंड) - वांद्रे 
कटिहार- गोरखपूर - मुंबई 

प्रस्तावित वेळ

गोमतीनगर- गोरखपूर- पूरी 
रुट चार्ट आणि वेळ (संभाव्य) 
प्रस्थान- गोमतीनगरहून संध्याकाळी 6.30 वाजता
आगमन- गोरखपूर रात्री 11 वाजता 
प्रस्थान- गोरखपूर रात्री 11.10 वाजता 
गंतव्य- पुरी शनिवार भोरमध्ये दुपारी 3.30 वाजता 

परत

शनिवारी पहाटे 3.30 वा
प्रस्तान-  पुरीहून शनिवारी रात्री 11.30 वाजता गोरखपूर 
आगमन रविवारी दुपारी 4 वाजता
4.10 वाजता गोरखपूरकडे प्रयाण
रात्री 8 वाजता गंतव्यस्थान गोमतीनगर

रामनगर-वांद्रे

रामनगर येथून गुरुवारी दुपारी ४.२५ वाजता प्रयाण आणि शनिवारी रात्री ८.५५ वाजता वांद्रे येथे आगमन.

परत

शनिवारी सकाळी 5.10 वाजता वांद्रे येथून प्रयाण
सोमवारी सकाळी 8.00 वाजता रामनगरला पोहोचेल.

मुंबई-गोरखपूर-कटिहार

प्रस्तावित वेळापत्रक
शनिवारी सकाळी 11 वाजता मुंबईहून निघेल

रविवारी संध्याकाळी 7 वाजतागोरखपूरला पोहोचेल, सोमवारी रात्री 11 वाजता कटिहारला पोहोचेल.

परत

कटीहारहून मंगळवारी सकाळी 5 वाजता

गोरखपूर आगमन बुधवारी 4 वाजता

मुंबईत गुरुवारी दुपारी 3 वाजता पोहोचेल

मुंबईत उत्तर भारतीय आणि बिहारमधून रोजगारासाठी आलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. मराठी तरुणांच्या रोजगारावर होणारा परिणाम यावरुन राजकीय पक्ष आक्रमक झालेले आपण पाहिले आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय

कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे सेवा सुरू होतील, असे सांगितले जात आहे. करोडो कामगार कामाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये प्रवास करतात. त्यामुळे गरीब आणि कामगार वर्गातील लोकांसाठी ही एक मोठी पर्वणी मानली जात आहे.

पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, बंगाल आणि झारखंड यांसारख्या भागातील प्रवाशी मोठ्या प्रमाणात इतर शहरांमध्ये नोकरी धंद्यासाठी विस्थापीत झालेले असतात. विशेषत: स्थलांतरित कामगार, दिल्ली, मुंबई, सुरत, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि काही भागांमध्ये उपजीविकेच्या संधींच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये प्रवास करतात. वेटिंग लिस्ट तिकिटांच्या पॅटर्नचा अभ्यास करून आणि अनेक स्थानकांवर जास्त गर्दीचे मूल्यांकन केल्यानंतर रेल्वेने हे मार्ग ओळखले आहेत.