CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजी स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

CNG PNG Price :   सीएनजी पीएनजी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने गुरूवारी कॅबिनेटमध्ये दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्राने आता सीएनजी पीएनजीच्या किंमती कच्चा तेलाशी लिंक केल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती आता भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक किंमतींच्या १० टक्के असणार आहेत.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2023, 07:53 AM IST
CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजी स्वस्त, नवीन दर जाणून घ्या title=

CNG PNG Price : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी. सीएनजी पीएनजी स्वस्त झालंय. सीएनजीचे दर सात टक्क्यांनी तर पीएनजीचे दर 10 टक्क्यांनी स्वस्त झालेत. केंद्र सरकारने गुरूवारी कॅबिनेटमध्ये दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्राने आता सीएनजी पीएनजीच्या किंमती कच्चा तेलाशी लिंक केल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती आता भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक किंमतींच्या 10 टक्के असणार आहेत. त्याचा लाभ घरगुती पीएनजी गॅस ग्राहकांना होईल. सरकारच्या या नव्या फॉर्म्युलामुळे दर महिन्याला सीएनजी पीएनजीचे दर निश्चित होतील. 

एमजीएलने शुक्रवारी मुंबईत गॅसच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. मुंबई शहरात सीएनजी 8 रुपये किलोने स्वस्त होईल आणि पीएनजीची किंमत 5 रुपये एससीएमने कमी झाली आहे. तर पुण्यात सीएनजी 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नैसर्गिक वायूची किंमत प्रति युनिट USD 7.92 इतकी मर्यादित असेल. तथापि, ग्राहकांसाठी दर प्रति युनिट USD 6.5 इतके मर्यादित करण्यात आले आहेत.

आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार

मुंबईत सीएनजीच्या दरात 8 रुपयांची कपात झाली आहे. शहरातील सीएनजीचे दर 87 रुपयांवरुन 79 रुपये प्रति किलो, तर पीएनजीच्या किमती 54 रुपयांवरुन 49 रुपयांपर्यंत कमी होतील. तर राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 6 रुपयांनी कमी झाली आहे. (प्रति किलो 79.56 रुपयांवरुन 73.59 रुपये). आणि पाइप्ड नॅचरल गॅसची किंमत 53.59 रुपये प्रति हजार क्यूबिक मीटरवरून 47.59 रुपये होईल - 6 रुपये प्रति हजार घनमीटर कपात. 

 देशातील नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दुरुस्तीला मंजुरी दिल्यानंतर कंपन्यांकडून सीएनजी-पीएनजीच्या किमतीत कपात केली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने CNG-PNG च्या किमती कमी केल्या आहेत. ATGL ने CNG 8.13 प्रति किलो आणि PNG 5.06 प्रति scm ने कमी केले आहे. 8 एप्रिलच्या मध्यरात्री 12 पासून नवीन किमती लागू होणार आहेत. 

नवीन दर जाणून घ्या








शहराचे नाव सध्याच्या सीएनजीच्या किमती (रु./किलो) अपेक्षित सीएनजी किमती (रु./किलो) सीएनजीच्या दरात बदल सध्याच्या PNG किमती (रु./SCM) अपेक्षित PNG किमती (रु./SCM) PNG किमतीत बदल
पुणे 92 87 5 57 52 5
सिंधुदुर्ग 95.9 89.9 6 55 50 5
मुंबई 87 79 8 54 49 5
दिल्ली 79.56 73.59 6 53.59 47.59 6
बेंगळुरु 89.5 83.5 6 58.5 52 6.5
मेरठ 91 83 8 58.5 52 6.5
बोकारो 93.98 86.98 7    

*Subject to final calculation of impact of unified tariff, RLNG component, earlier cost transfer to consumers, etc.

CNG, पाईप लाईनद्वारे पुरवठा करणाऱ्यात येणाऱ्या स्वयंपाकाचा गॅस 10 टक्क्यांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जेच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर, पाईप कुकिंग गॅस (PNG) आणि CNG च्या किमती ऑगस्ट 2022 पर्यंत एका वर्षात 80 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची सध्याची किंमत USD 85 प्रति बॅरल आहे.