CM योगींनी यासाठी मध्येच थांबवला ताफा, कारण समोर आल्यानंतर लोकांकडून होतंय कौतूक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ (Lucknow) मध्ये अचानक आपला ताफा एका बाजुला करण्याचे आदेश दिले. 

Updated: Apr 1, 2022, 04:33 PM IST
CM योगींनी यासाठी मध्येच थांबवला ताफा, कारण समोर आल्यानंतर लोकांकडून होतंय कौतूक title=

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ (Lucknow) मध्ये अचानक आपला ताफा एका बाजुला करण्याचे आदेश दिले. योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यासाठी इतर सामान्य ट्राफीक रोखण्यात आली होती. पण जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी एक अॅम्ब्युलन्स अडकलेली पाहिली. तेव्हा त्यांनी ती रुग्णवाहिका आधी काढण्याचे निर्देश दिले.

पोलीस उपायुक्त सुभाष चंद्र शाक्य यांनी माहिती देताना म्हटलं की, मुख्यमंत्री यांचा ताफा (CM Yogi Convoy) हजरतगंज (Hazratganj) येथून बंदरिया बाग (Bandaria Bagh) कडे निघाला होता.

राजभवनच्या जवळ योगींनी एक रुग्णवाहिका ट्राफीकमध्ये फसलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांचा ताफा रस्त्याच्य़ा एका बाजुला करुन रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग करुन देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतूक केलंय.