नवी दिल्ली : ताजमहल मकबरा आहे की शिवमंदिर? असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं (CIC) सरकारकडे विचारलाय.
ताजमहलचा इतिहास जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकारांतर्गत एक याचिका आयोगाकडे करण्यात आलीय. याच मुद्द्यावर CIC नं सांस्कृतिक मंत्रालयाचं मत विचारलंय. तसंच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणलाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.
जगातील आश्चर्यांपैकी एक असलेली संगमरवरनं बनलेली ही इमारत शाहजहाँनं बनवलेला मकबरा आहे की राजा मानसिंह या राजपूत राजानं बनवलेला आणि मुगल शासकाला भेट दिलेलं शिवालय आहे? असा प्रश्न CIC चे आयुक्त श्रीधर आचार्यालू यांनी विचारलाय.
उल्लेखनीय म्हणजे, याअगोदर ताजमहलच्या इतिहासाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टासमवेत देशातील इतर अनेक न्यायलयांनी खटले रद्दबादल ठरवलेत. आगरामध्ये शुभ्र पांढऱ्या रंगाच्या संगमरवरनं बनलेला स्मारक जगातील सात आश्चर्यांपैंकी एक आहे.