नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाईन फ्लू झाला आहे. राज्यसभेमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून काही कागदपत्र पटलावर ठेवायची होती पण जावडेकर उपस्थित नसल्यामुळे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी ही कागदपत्र राज्यसभेमध्ये मांडली आहेत.
स्वाईन फ्लू झाल्यामुळे प्रकाश जावडेकर गेल्या दोन दिवसांपासून घरी आराम करत आहेत. याआधी अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव, अभिनेत्री रिचा चड्डा आणि अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण झाली होती.
२०१७या वर्षात जून महिन्यापर्यंत तब्बल १३,१८८ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचा अधिकृत आकडा आहे. तर देशभरात स्वाईन फ्लूमुळे ६३० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.