मुंबई : भारतामध्ये कितीही विविधता असली तरीही काही गोष्टींमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर साम्य आढळुन येतं. अशीच एक गोष्ट म्हणजे भारतीयांच्या आवडीची पेयं. चहा आणि कॉफी या पेयांवर तर भारतीयांचं विशेष प्रेम. पण, हे प्रेम नेमकं किती प्रमाणात आहे याचा विचार कधी केला आहे का तुम्ही?
‘उबर इट्स’ने केलेल्या एका निरिक्षणातून अतिशय रंजक असा निष्कर्ष समोर आला आहे. बंगळुरु या शहरात चहाप्रेमींची संख्या तुलनेने जास्त आहे. ज्या यादीत पुणे आणि दिल्लीचाही समावेश आहे.
कॉफीविषयी सांगावं तर या सर्व्हेनुसार इंदुरमध्ये हे पेय पिण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं.
मुंबईकरांचं चहावर कितीही प्रेम असलं तरीही या सर्व्हेनुसार दिवसातून मुंबईकर चहापेक्षा कॉफी पिण्याला जास्त प्राधान्य देतात.
राजधानी दिल्लीमध्ये चहा पिण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे एका अर्थी चहावरचं मुंबईकरांचं प्रेम आटलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
घर, ऑफिस किंवा एखादी मिटींग, प्रत्येक ठिकाणी चहा किंवा कॉफी अशी कॅफिनयुक्त पेय पिण्याला भारतीय प्राधान्य देत असल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.
ही झाली सर्व्हेची गोष्ट. पण, तुम्ही कोणतं पेय पिण्याला प्राधान्य देता? चहा की कॉफी? बरं त्यातही तुमची विशेष अशी आवड आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.