Zero Shadow Day Mumbai : आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही. मात्र निसर्ग आणि भूगोलातील काही शास्त्रीय घडामोडींमुळे सावली देखील काही वेळासाठी आपली साथ सोडते. हा दिवस म्हणजे शून्य सावली दिवस(experienced Zero Shadow Day) म्हणून ओळखला जातो. बंगळुरूमध्ये आज (15 मे) नागरिकांनी Zero Shadow Day चा अनुभव घेतला. मुंबईकरांनी काही दिवसांपूर्वीच शून्य सावलीचा अनुभवता घेतला होता. महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये देखील हा Zero Shadow Day चा अनुभव आला होता.
‘शून्य सावली दिवस’ या भौगोलिक घटनेचं कुतूहल सगळ्यांना असतं. सावल्यांचा खेळ सर्वांनाच आनंददायी वाटतो. आपल्या आजूबाजूला खेळणारी सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडून जाते.
सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या भौगोलिक कारणामुळे सावली आपली साथ सोडते. झिरो शॅडो डे सहसा वर्षातून दोनदा येतो. खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक महत्त्वाची घटना आहे. सूर्याच्या हालचाली आणि आकाशातील त्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी Zero Shadow Day हा अत्यंत महत्वाचा मानला जातो.
सूर्यप्रकाशात असल्यावर खगोलशास्त्रानुसार, तुमची सावली तयार होते. परंतु खगोलशास्त्रज्ञांच्या मते, वर्षात असे 2 दिवस असे असतात जेव्हा सूर्यकिरणांच्या प्रभावाखाली येऊनही कोणत्याही वस्तूची किंवा मानवी शरीराची सावली तयार होत नाही. त्याला शून्य सावली दिवस म्हणतात.
Zero Shadow प्रभाव हा काही तास किंवा मिनिटांसाठीच असतो. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. दुपारी सूर्य अगदी डोक्याच्या वर असला तरी आपली सावली आपल्याला दिसत नाही. बंगळुरूमधील नागरिकांनी याचा अनुभव घेतला.
सांगलीत स्पेस स्टेशन बांधण्यासाठी महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. सांगली महापालिकेत अनोखी अभिरुप महासभा पार पडली. यावेळी अभिरुप सभेत कल्पनेपलीकडील ठराव मंजूर करण्यात आलेयत. चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्पेस स्टेशन बांधण्यासह दुबईत अभ्यास दौरा आणि दुबईतून कंदील दिवे आणण्यास मान्यता द्यावी .महापौर आणि उपमहापौरांसाठी महागड्या वाहनांऐवजी हत्ती, घोडे खरेदी करावेत असे निर्णयही या महासभेत घेण्यात आले होते. अभिरूप सभा म्हणजे लोकशाहीची आणि सभागृहातील कामाची ओळख व्हावी यासाठी प्रतिरुप सभा घेतली जाते...या सभेत मंजूर केलेले ठराव प्रत्यक्षात आणले जात नाहीत. त्यामुळे या अनोख्या सभेची आता चांगलीच चर्चा रंगली होती.