ICSE ISC 10th and 12th Result 2024 Out: केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE) आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना https://cisce.org/ किंवा results.cisce.org या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट चेक करता येणार आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी युआयडी आणि इंडेक्स नंबरची नोंद करावी लागणार आहे.
ICSE आणि ISC परीक्षा वर्ष 20224च्या निकाल जाहीर झाले आहेत. 2,695 शाळांपैकी 82.48 टक्के शाळांमधील विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण झाले आहेत. ICSE परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.31 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर बारावीच्या परीक्षांमध्येही मुलींनीच बाजी मारली असून 98.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 97.53 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) डिसेंबर 2023मध्ये बोर्डाच्या परीक्षा जाहीर केल्या होत्या. यावर्षी जवळपास 2.5 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. आयसीएसई इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत चालली होती. तर, बारावीच्या परीक्षा 12 फेब्रुवारी ते 2 एप्रिलपर्यंत होत्या. आता दहावी आणि बारावी दोन्ही इयत्तांचे रिझल्ट जारी करण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी हे रिझल्ट पाहू शकणार आहेत.
आयसीएसई किंवा आयएससी निकालांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा निकाल खूप चांगला लागला आहे. या दोन्ही राज्यात 99.71 टक्के इतका निकाल लागला आहे. ISC इयत्ता बारावीच्या निकालात पश्चिम विभाग दुसऱ्या नंबरवर आहे. 99.32 इतका निकाल लागला आहे. तर, ISC इयत्ता बारावीचा सर्वोत्तम निकाल दक्षिण विभागात लागला आहे. गत वर्षी महाराष्ट्र ISC (98.69) आणि ICSE (99.83) या दोन्हींमध्ये अव्वल होता.
CISCEच्या अधिकृत वेबसाइट cisce.org/ किंवा results.cisce.org वर जा
होमपेजवर आयसीएसई किंवा आयएससी बोर्ड परीक्षा 2024 या लिंकवर क्लिक करा
आता युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड नोंद करा
आता तुमचा रिझल्ट स्क्रीनवर समोर येईल
तुम्ही तुमची रिझल्टची ऑनलाइन प्रिंट डाउनलोड किंवा प्रिंटआउट काढून स्वतःजवळ ठेवू शकता.