अपहरण झालेला चिमुकला कळव्यात सापडला!

कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2017, 04:12 PM IST
अपहरण झालेला चिमुकला कळव्यात सापडला! title=

ठाणे :  वाशी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मुलाचे अपहरण होत असताना दिसल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पण आता या मुलाचा सुगावा लागला आहे.कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. रघु शिंदे असे या चिमुरड्याचे नाव आहे.
पोलिसांनी मुलाला आपल्या ताब्यात घेत रघूला त्याच्या आई-वडिलांकडे देण्यात आले आहे. मात्र, आरोपी फरार असून त्याने रघूचं अपहरण का केलं याबाबत पोलीसांचा शोध सुरु आहे. 

सीसीटीव्हीमध्ये आरोपी मुलाला कडेवर उचलून घेऊन जाताना दिसत होता. यात आरोपची चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तसेच तो झिंगलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे एखाद्या दारुड्याने किंवा अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याने मुलाचे अपहरण केले असावे अशी शंका उपस्थित केली जात होती. मुलगा सुखरूप मिळाल्याने घरातील मंडळी आनंदात आहेत.