मोठा अपघात! पाहा CDS बिपीन रावत यांच्या Helicopter Crash चा भीतीदायक व्हिडीओ

बिपीन रावत हे देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख 

Updated: Dec 8, 2021, 03:52 PM IST
मोठा अपघात! पाहा CDS बिपीन रावत यांच्या Helicopter Crash चा भीतीदायक व्हिडीओ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांना एका भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं आहे. तामिळनाडूतील निलगीरी येथे असणाऱ्या कन्नूर भागा बुधवारी ही घटना घडली. (general Bipin rawat)

जिथं लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. अनेक ठिकाणून करण्यात आलेल्या दाव्यानुसार या हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपीन रावत यांच्यासह सैन्यदलातील जवळपास 14 जण हजर होते. 

14 जणांमधील बहुतांशजण हे उच्चपदावर सेवेत रुजू असल्याची माहिती मिळत आहे. 

एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण बाहेर पडले असल्याचं कळत आहे. दरम्यान, हा अपघात झाला आणि सदर घटनेनं सारा देश हादरला. 

अद्यापही अपघातग्रस्तांचा शोध घेण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. 

सध्याच्या घडीला या घटनेच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये दाखवण्यात आलेल्यानुसार हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमामात नुकसान झाल्याचं दिसत आहे. 

आतापर्यंत अपघातातून मिळालेल्या व्यक्ती या 80 टक्के भाजल्याचं म्हटलं जात आहे. 

झाडाझुडपांमध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमुळे सदर घटनास्थळी आगीचे लोट उठत असल्याचंही पाहायला मिळत आहे. 

मागील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2020 मध्ये जनरल रावत यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. लष्करुप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडत पदभार पुढील अधिकाऱ्याच्या हाती सोपवल्यानंतर त्यांना सीडीएसपदी नियुक्त केलं गेलं.