नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना पुन्हा झटका बसला आहे. चिदम्बरम यांची २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान कोर्टनं चिदम्बरमन यांना घरचं जेवण, औषध आणि वेस्टर्न टॉयलेट वापरण्याची परवानगी दिली आहे. चिदम्बरम यांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी चिदम्बरमन सीबीआयच्या ताब्यात होते. ईडीनं सीबीआयकडे चौकशीसाठी पी. चिदम्बरमन यांचा १४ दिवसांसाठी ताबा मिळावा अशी मागणी केली होती.
ईडी मुख्यालयात तुरुंग नसल्याने ईडीचे अधिकारी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आरोपीला रात्री पोलीस स्थानकाच्या लॉकउपमध्ये ठेवतात. जेव्हा ईडी कोणाला अटक करते तर आरोपीची अनेक तास चौकशी करते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपीची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर पोलीस स्थानकाच्या तुरुंगात आरोपीला ठेवलं जातं.