छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजीत जोगी यांचं निधन

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचं शुक्रवारी निधन झालं.

Updated: May 29, 2020, 05:08 PM IST
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजीत जोगी यांचं निधन title=

नवी दिल्ली : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचं शुक्रवारी निधन झालं. अजीत जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २० दिवसांपासून त्यांच्यावर रायपूर येथे उपचार सुरु होते. त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.

अजीत जोगी यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेताना त्रास होत होता ९ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कार्डियक अरेस्ट आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवस त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

अजीत जोगी हे छत्तीसगडचे पहिलं मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेशमधून छत्तीसगड राज्यांची निर्मिती झाल्यानंतर नोव्हेंबर 2000 ते नोव्हेंबर २००३ दरम्यान ते मुख्यमंत्री राहिले. जोगी यांनी २०१६ मध्ये काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) ची स्थापना केली होती.

दोन वेळा राज्यसभा सदस्य, दोन वेळा लोकसभा सदस्य, एक वेळा मुख्यमंत्री राहिलेले अजीत जोगी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील होते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अजीत जोगी यांच्या निधननावर शोक व्यक्त केला आहे.