स्टेट बँकेच्या या ग्राहकांचे चेक ३१ डिसेंबरनंतर नाही चालणार

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 27, 2017, 01:00 PM IST
स्टेट बँकेच्या या ग्राहकांचे चेक ३१ डिसेंबरनंतर नाही चालणार title=

मुंबई : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

एसबीआयने नवे निर्देश जारी केले आहेत. ज्यानुसार तुम्हाला लवकरात लवकर चेकबुकसाठी अर्ज करावा लागेल. कारण ३१ डिसेंबरनंतर तुमचा जुना चेकबूक अवैध होणार आहे. याआधी अंतिम तारीख ३१ सप्टेंबर होती पण ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. 

जुन्या चेकबूकवर लिहिलेले IFS (Indian Financial System) कोड देखील अवैध ठरणार आहेत. एसबीआयने आपल्या  सब्सिडियरी बँकांच्या कस्टमर्सला लवकरात लवकर नवीन चेकबूक घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आयएफएस कोडसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

एसबीआयशी संबंधित सर्व बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांसाठी हा आदेश लागू होणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचं अकाऊंट खाली दिलेल्या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला नवीन चेकबूकसाठी अर्ज करावा लागणार आहे.

या आहेत त्या ६ बँका

१. स्टेट बैंक ऑफ त्रावणकोर
 
२. स्टेट बैंक ऑफ पटियाला

३. स्टेट बैंक ऑफ हैदराबाद

४. स्टेट बैंक ऑफ बीकानेर और जयपुर
 
५. स्टेट बैंक ऑफ रायपुर

६. भारतीय महिला बैंक

ग्राहक नव्या चेकबूकसाठी इंटरनेट आणि मोबाईल बँक द्वारे देखील अर्ज करु शकता. याशिवाय एटीएम आणि होम ब्रांचमध्ये जाऊन देखील अप्लाय करु शकता.