जगाच्या तुलनेनं भारतातील 'हे' शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन

cheapest cities world:  जगभरातील एकंदर 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले.  

Updated: Dec 7, 2022, 12:47 PM IST
जगाच्या तुलनेनं भारतातील 'हे' शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन title=
cheapest city out 173 cities world in India, has a special connection with the PM narendra modi

Most Expensive Cities : ग्लोबल सर्व्हे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटकडून  (EIU) सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये त्यात राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहर कोणते, या विषयाचाही समावेश होता. या पाहणीनंतर दहा शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात भारतातील एक शहर स्वस्तच्या यादीत असल्याचे ईआययूच्या सर्व्हे अहवालातून समोर आलंय.

जगभरातील एकंदरीत 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले. या पाहणीत बहुतांश युरोपीय आणि विकसित असलेल्या आशियाई देशांच्या शहरांमधील जीवनमान महाग असल्याचे निदर्शनास आले. ईआययूने सर्व्हेसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा मार्केट डेटा संकलित केला. दरम्यान जागतीक सर्वेनुसार सिंगापूर (Singapore) आणि न्युयॉर्क (New York) जगभरातली सगळ्यात महागडी शहरं ठरली आहेत. जगाच्या तुलनेनं भारतीय शहरं स्वस्त असल्याचा दावाही करण्यात आला. आता विशेष म्हणजे मुंबई (mumbai news) महागड्या शहरांच्या रांगेतही नसल्याचं स्पष्ट झालेय. 

वाचा : "रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठता तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवत?" 

भारतीय शहरं स्वस्तच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याशी खास कनेक्शन असलेलं अहमदाबाद (Ahmedabad cheapest cities) या शहराचा समावेश आहे.  तर न्यूयॉर्क शहर पहिल्यांदाच महागड्या शहरांच्या यादीत सर्वोच्च स्थानी विराजमान झालाय. गेल्यावर्षी पहिल्या स्थानी इस्रायलमधील तेल अवीव हे शहर होतं. यंदा मात्र तेल अवीव तिसऱ्या स्थानी आहे. जगातील या महागड्या शहरांमध्ये राहण्याचा सरासरी खर्च 8.1 टक्के इतका आहे, असं EIU नं अहवालात म्हटलंय. तर रशिया-युक्रेन संघर्ष आणि कोव्हिडमुळे पुरवठा साखळीवर झालेला परिणाम या कारणांमुळे राहणीमानाच्या खर्चात वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. इस्तांबुलमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात आहे. तिथल्या किंमती 86 टक्क्यांनी, बुएनोस आइरेसमध्ये 64 टक्के, तर तेहरानमध्ये 57 टक्क्यांनी वाढ झालीय.

अमेरिकेतील उच्च चलनवाढ हे न्यूयॉर्कचे (New York) अव्वल स्थान होण्याचे एक कारण होते. तर लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को (Los Angeles and San Francisco) सुद्धा जगातल्या महागड्या शहरांमधील पहिल्या 10 मध्ये आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतील महागाई गेल्या 40 वर्षातील सर्वोच्च स्थानी होती. डॉलर मजबूत होत जाणं हेही अमेरिकेतील शहरं महागडी होण्यामागे कारण होतं. मॉस्को आणि सेंट पिटर्सबर्ग ही शहर अनुक्रमे 88 आणि 70 व्या स्थानांवरून 37 आणि 73 व्या स्थानी विराजमान झाले. पाश्चिमात्य देशांनी आणलेल्या निर्बंधांचा हा परिणाम मानला जातोय.

जगातील सर्वात महागडी शहरं (2022)

1. न्यूयॉर्क

1. सिंगापूर

3. तेल अवीव

4. हाँगकाँग

4. लॉस एंजेलिस

6. झ्युरिक

7. जिनिव्हा

8. सॅन फ्रान्सिस्को

9. पॅरिस

10. सिडनी

10. कोपनहेगन

स्वस्त शहरं

161. कोलंबो

161. बंगळुरू

161. अल्गियर्स

164. चेन्नई

165. अहमदाबाद

166. अल्मॅटी

167. कराची

168. ताश्कंद

169. ट्युनिस

170. तेहरान

171. त्रिपोली

172. दमास्कस