Chardham Yatra 2023: चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्ज कसा करावा

Chardham Yatra 2023: आत्तापासून नोंदणी प्रक्रियेसाठी भाविक प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, रजिस्ट्रेशन (How to Registration for Chardham Yatra 2023) करायचं तरी कसं?

Updated: Feb 21, 2023, 10:09 AM IST
Chardham Yatra 2023: चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्ज कसा करावा title=
Chardham Yatra 2023 Online registration

Chardham Yatra 2023: मागील दोन वर्ष कोरोनामुळे केदारनाथ (Kedarnath), चारधाम यात्रा बंद होती. त्यामुळे येथील भाविकांवर मोठा परिणाम झाला होता. अशातच आता महाशिवरात्रीला (Mahashivratri) केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख (Kedarnath Opening Date) निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुम्हीही चारधाम यात्रेला (Chardham Yatra 2023) जाण्याची तयारी करत असाल तर ही माहिती उपयोगीची ठरेल. (Chardham Yatra 2023 Online registration for Chardham Yatra begins know how to apply latest marathi news)

एप्रिल महिन्यात चारधाम यात्रा सुरू होत आहे. केदारनाथ (Kedarnath Dham) आणि बद्रीनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे 25 एप्रिल आणि 27 एप्रिल रोजी उघडतील. गंगोत्री धामचे (Gangotri Dham) दरवाजे 22 एप्रिलला उघडले जाणार आहेत. त्यामुळे आत्तापासून नोंदणी प्रक्रियेसाठी भाविक प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, रजिस्ट्रेशन (How to Registration for Chardham Yatra 2023) करायचं तरी कसं? असा सवाल अनेकांना पडला आहे.

नोंदणी कशी कराल? (know how to apply)

पर्यटन विभागाने नोंदणीबाबत चार पर्याय दिले आहेत. चारधाम यात्रेसाठी registrationandtouristcare.uk.gov.in या पर्यटन विभागाची वेबसाइटचा वापर करता येतो. व्हॉट्सअॅप क्रमांक ८३९४८३३८३३, त्याचबरोबर टोल फ्री क्रमांक १३६४ आणि मोबाइल अॅप टुरिस्टकेअर उत्तराखंड याद्वारे ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करता येईल. सकाळी ७ वाजल्यापासून वेबसाइट, टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक आणि मोबाइल अॅपवर नोंदणी सुरू झाली आहे.

2022 मध्ये 17 लाख 60 हजार 646 भाविकांची गर्दी

दरम्यान, गेल्या वर्षी 17 लाख 60 हजार 646 भाविक बद्रीनाथ धाममध्ये पोहोचले होते. त्यामुळे मागील वर्षी विक्रमी गर्दी पहायला मिळाली होती. 22 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. त्यामुळे आता भाविक आतुरतेने वाट पाहत असल्याचं पहायला मिळतंय.