Chandrayaan-3 Mission: भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेने पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. चंद्रावर सध्या रात्र सुरु झाली आहे. यामुळे चांद्रयान 3 चा विक्रम लँडर आणइ प्रज्ञान रोव्हर सध्या स्लीप मोडवर आहे. स्लीप मोडवर असलेले चांद्रयान 3 चा विक्रम लँडर नेमका आहे कुठे. चांद्रयान-2 ऑर्बिटरने चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरची नेमकी लोकेशन शोधून काढली आहे. चांद्रयान-2 ऑर्बिटरने काढलेले चांद्रयान 3 चे फोटो इस्रोने शेअर केले आहेत.
चांद्रयान-2 ऑर्बिटरमध्ये DFSAR हे एक खास पेलोड आहे. DFSAR पेलोड अजूनही अॅक्टीव्ह आहे. DFSAR पेलोड म्हणजे एक हाय रेज्यूल्येशन कॅमेरा आहे. DFSAR पेलोडच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारतही हाय रेज्यूल्येशन पॉलीरीमेट्रिक मोडवर फोटो कॅप्चर करु शकतो. अंधारात धातूंमधून उत्सर्जित होणारी उष्णता आणि प्रकाश कॅप्चर करण्याची क्षमता DFSAR पेलोडमध्ये आहे.
चांद्रयान-2 ऑर्बिटरमध्ये असलेल्या DFSAR कॅमेऱ्याने चांद्रयान 3 च्या लँंडिग आधी आणि चांद्रयान 3 च्या लँडिंगनंतर काढलेले दोन्ही फोटो इस्रोने शेअर केले आहेत. एक फोटो हा 2 जून 2023 चा आहे. यावेळी चांद्रयान-2 चे काढलेल्या फोटोत चांद्रयान 3 लाँच झालेले दिसत नाही. दुसरा फोटो हा 6 सप्टेंबरचा फोटो. या फोटोत चांद्रयान-3 चा विक्रम लँडर गोल पिवळ्या वर्तुळात पिवळ्या प्रकाशात दिसत आहे.
भारताची चांद्रयान 3 मोहिम अयशस्वी झाली होती. 2019 पासून चांद्रयान -2 चा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत आहे. चांद्रयान 3 चे लँंडिग होत असताना चांद्रयान -2 चा ऑर्बिटरची मदत झाली. चांद्रयान 3 चा चांद्रयान 2 शी संपर्क झालाय, इस्रोनं ट्विट करत ही माहिती दिली होती. चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरनं चांद्रयान-2 मिशनच्या ऑर्बिटरसोबत संचार लिंक अर्थात संवाद प्रस्थापित केलाय. "स्वागत आहे, मित्रा" असा संदेश चांद्रयान-2 च्या माध्यमातून पाठवण्यात आला होता.
14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान 3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर सध्या रात्र सुरु झाली आहे. चंद्रावर रात्र असल्यानं विक्रम आणि प्रग्यान स्लिपिंग मोडवर असतील. 22 सप्टेंबरला सुर्योदयानंतर बॅटरीज चार्ज होतील आणि पुन्हा चांद्रयान मोहीम सुरू होईल.