Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO च्या अथक परिश्रमांनंतर चांद्रयान 14 जुलै रोजी चंद्राच्या दिशेनं अवकाशात झेपावलं. ज्यानंतर आता याच चांद्रयानानं अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, ते चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. इस्रोकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
इस्रोच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठाच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आता चांद्रयानाची कक्षा आणखी कमी करण्यात आली असून, हे अंतर 174 किमी x 1437 किमी इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता इस्रोसह संपूर्ण जगाची नजर 14 ऑगस्टवर असणार आहे. कारण, या दिवशी पुन्हा एकदा यानाची कक्षा कमी करण्यात येणार आहे. परिणामी चंद्रापासूनचं त्याचं अंतर आणखी कमी होणार आहे.
Chandrayaan-3 Mission:
Even closer to the moon’s surface.Chandrayaan-3's orbit is reduced to 174 km x 1437 km following a manuevre performed today.
The next operation is scheduled for August 14, 2023, between 11:30 and 12:30 Hrs. IST pic.twitter.com/Nx7IXApU44
— ISRO (@isro) August 9, 2023
9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी चांद्रयानाच्या कक्षा बदलण्यात आल्या. म्हणजेच चांद्रयानाचे थ्रस्टर्स सुरु करण्यात आले. 5 ऑगस्ट रोजी जेव्हा चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचलं तेव्हा चारही बाजुंनी 1900 किमी प्रती सेकंदांच्या वेगानं ते 164 x 18074 किमी या अंडाकृती कक्षेत प्रवास करत होतं. ज्यानंतर 6 ऑगस्टला त्याला 170 x 4313 किमी कक्षेत पाठवलं गेलं. म्हणजेच ते चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचलं होतं.
14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी पावणेबारा वाजल्यापासून 12.04 वाजेपर्यंत चांद्रयानाची कक्षा बदलली जाईल.
16 ऑगस्ट 2023 ला सकाळी 8:38 ते 8:39 पर्यंत पुन्हा एकदा पाचव्यांदा चंद्राची कक्षा बदलण्यात जाईल. म्हणजेच फक्त एका मिनिटासाठी चांद्रयानाचं इंजिन सुरु करण्यात येईल.
17 ऑगस्टला 2023 चांद्रयानाचे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील आणि याच दिवशी दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या चारही बाजुंनी 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत परिक्रमण करतील.
18 ऑगस्टला 2023 रोजी दुपारी पावणेचार वाजल्यापासून पुढील पंधरा मिनिटांसाठी लँडर मॉड्यूलची डिऑर्बिटींग होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी करण्यात येईल.
20 ऑगस्टला चांद्रयान 3 च्या लँडर मॉड्युलची डीऑर्बिटिंग होईल आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करेल. सर्व गोष्टी
ठरवल्याप्रमाणं घडल्यास लँडर चंद्राच्या पृष्ठावर असेल आणि भारताचं नाव थेट अवकाळाच कोरलं जाईल.