'अपयशी झालो तरीही...', Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?

Chandrayaan 3 : 14 जुलै रोजी भारताचं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि टप्प्याटप्प्यानं आता ते चंद्राच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. याच चांद्रयान मोहिमेसंदर्भातील ही मोठी बातमी   

सायली पाटील | Updated: Aug 9, 2023, 09:39 AM IST
'अपयशी झालो तरीही...', Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?   title=
(छाया सौजन्य- इस्रो)/ chandrayaan 3 Latest update isro chief S Somanath on failure in landing makes big statment vikram lander

Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी कुतूहल व्यक्त करताना दिसत आहेत. यादरम्यानच इस्रो प्रमुखांनी सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

ISRO च्या प्रमुखपदी असणाऱ्या एस. सोमनाथ (ISRO Chief) यांनी नुकतंच यानाच्या लँडिंगबाबत सूचक वक्तव्य केलं. भारताच्या तिसऱ्या चांद्रयान मोहिमेविषयी सांगताना ते म्हणाले, चांद्रयानाचे दोन्ही इंजिन बंद पडले तरीही ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. 

दिशा भारत या स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान, संवाद साधताना सोमनाथ यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं. लँडरची आखणीच अशी केली आहे, की तो अपयशालाही सामोरं जात मोहिम यशस्वी कपु शकतो. खुद्द सोमनाथच असं म्हणाल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं.

'सर्व बाबतीत अपयशी ठरलो, सगळे सेन्सर बंद पडले, काहीही सुरु राहिलं नाही तरीही विक्रम चंद्रावर यशस्वी लँडिग करेल. तो त्याच पद्धतीनं तयार केला आहे', या वक्तव्यावर सोमनाथ यांनी भर दिला. कितीही अडचणी आल्या, आव्हानं आली तरीही या साऱ्यावर मात करण्याच्याच अनुषंगानं इस्रोकडून विक्रम लँडर तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 च्या लँडर, रोवरसंदर्भातील लक्षवेधी माहिती पहिल्यांदाच जगासमोर; विचारही केला नसेल की...

 

यावेळी सोमनाथ यांनी आपल्यापुढील सर्वात मोठं आव्हानही बोलून दाखवलं. इथं सर्वात मोठं काम असेल ते म्हणजे आडव्या दिशेनं असणाऱ्या विक्रमला उभं करत चंद्रावर त्याचं लँडींग करणं. एकदा का, लँडर ऑर्बिटरपासून वेगळा झाला की तो आडव्या दिशेत येईल. ज्यानंतर manoeuvres च्या सत्रादरम्यान त्याला हळुहळू उभं करण्यात येईल. हेच काम आव्हानाचं आणि परीक्षा पाहणारं असणार आहे असंही सोमनाथ यांनी स्पष्ट करत इस्रो चांद्रयानाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचं ते म्हणाले.