Chandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास

 लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या (Lunar Orbit Injection - LOI) माध्यमातून  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची  प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चांद्रयान 3 आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 5, 2023, 08:30 PM IST
Chandrayaan 3 LOI:  चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास   title=

Chandrayaan 3 Lunar Orbit Injection:  चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडवला.  चांद्रयान 3 ची दिशा बदललीा आहे. चांद्रयान 3 लुनार ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे. लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या (Lunar Orbit Injection - LOI) माध्यमातून  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची  प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. आता चांद्रयान 3 चंद्राभोवती दीर्घ वतुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत   23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. 

1 ऑगस्ट रोजी  चांद्रयान-3 नं पृथ्वीभोवतीची आपली परिक्रमा पूर्ण केली. यानंतर ते चंद्राकडे झेपावले. आता  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती परिभ्रमण करत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचेल. 

वैज्ञानिकांची खरी परिक्षा...

चांद्रयान 3 मोहिमेतील हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जात होता.  इस्त्रोच्या वैज्ञानिकांची ही खरी परीक्षा होती. कारण लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आणण्यात आले आहे. चांद्रयान-3 हने थेट चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला  आहे. यामुळे चांद्रयान-3 ची गती कमी करण्यात आली आहे. गती कमी केल्यामुळे चांद्रयान-3 हे चंद्राच्या  गुरुत्वाकर्षण कक्षेत व्यवस्थित रित्या स्थिरावल्यास ही मोहिम विनाअडथळा पार पडले असा विश्वास वैज्ञांनिकांनी व्यक्त केला आहे. 

असा आहे चांद्रयान - 3 चा पुढचा प्रवास

चांद्रयान -3 ने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले आहे. आता चांद्रयान- 3 हे चंद्राभोवती 166 किमी x 18054 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणार आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेचा वेध घेण्यासाठी इस्रोने चांद्रयान-3 चे  थ्रस्टर्स सुमारे 20 ते 25 मिनिटे चालू ठेवले. चांद्रयान -3 ने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत स्थिरावले आहे.  आता  चांद्रयान -3  चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत पुढे जाईल. 
चांद्रयान -3 च्या कक्षा बदलण्याच्या प्रक्रियेला लुनर ऑर्बिट इंजेक्शन किंवा इन्सर्शन (LOI)  असे म्हणातात. चांद्रयान -3  चंद्राभोवती 5 लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणार आहे. 6 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चांद्रयान 10 ते 12 हजार किलोमीटरच्या कक्षेत टाकले जाईल.  9 ऑगस्ट रोजी दुपारी 2.45 च्या सुमारास  4 ते 5 हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाईल. 

फक्त 18 दिवस उरलेत

14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान - 3 चे चंद्रापासूनचे अंतर हे 1000 किलोमीटरपर्यंत कमी होईल. पाचव्या ऑर्बिट मॅन्युव्हरमध्ये चांद्रयान 1 चंद्राच्या 100 किमीच्या कक्षेत आणले जाईल. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. 18 आणि 20 ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंग होईल. चंद्राच्या कक्षेतील अंतर कमी होईल. लँडर मॉड्यूल 100 x 35 किमीच्या कक्षेत जाईल.  23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चांद्रयानचे लँडिंग केले जाईल.  चांद्रयान -3 मोहिम यशस्वी होण्यास आता फक्त 18 दिवसांचा प्रवास राहिला आहे.