Chandrayaan 3 Latest Update : इस्रोची (isro) महत्त्वपूर्ण अशी चांद्रयान मोहिम आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचली असून, चंद्रावर भारताची मोहोर उमटण्यासाठी अवघ्या काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याचं पाहायला मिळत आहे. Chandrayaan 3 च्या लाईव्ह लोकेशनसह नुकतंच इस्रोनं त्याच्या प्रवासाची आतापर्यंतची माहिती आणि पुढील प्रवासाचा मार्ग यासंदर्भातील माहिती दिली आहे.
14 जुलै 2023 ला चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं.
15 जुलै रोजी त्याची कक्षा वाढवून 41,762 km x 173 km करण्यात आली.
17 जुलैला चांद्रयान 3 ची कक्षा पुन्हा एकदा वाढवण्यात आली. जिथं हे प्रमाण 41,603 km x 226 km करण्यात आली.
18 जुलै रोजी तिसऱ्यांदा चांद्रयानाची कक्षा वाढवून 5,1400 km x 228 km करण्यात आली.
पुढे 20 जुलै रोजी आणखी एका वेळेस कक्षा वाढवत ती 71,351 x 233 Km करण्यात आली.
25 जुलैलासुद्धा चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात आली. यावेळी हे प्रामाण 1.27,603 km x 236 km इतकं होतं.
31 जुलै - 1 ऑगस्टला चांद्रयान 3 नं पृथ्वीची कक्षा ओलांडत चंद्राच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं.
Chandrayaan-3 Mission:
The spacecraft has covered about two-thirds of the distance to the moon.Lunar Orbit Injection (LOI) set for Aug 5, 2023, around 19:00 Hrs. IST. pic.twitter.com/MhIOE65w3V
— ISRO (@isro) August 4, 2023
इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान 3 नं आतापर्यंत दोन तृतीयांश प्रवास पूर्ण केला आहे. म्हणजेच चंद्रापर्यंत पोहोचण्याचा 66 टक्के प्रवास या यानानं पूर्ण केला आहे. 5 ऑगस्ट रोजी आता हे चांद्रयान सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असून, 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर लँड करेल. 1 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत त्यानं चंद्राच्या रोखानं प्रवास सुरु केला होता. चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याआधी चांद्रयान अंडाकृती कक्षेत परिक्रमा करत होतं. पृथ्वीपासून याचं किमन अंतर 236 किमी आणि जास्तीत जास्त अंतर 1 लाख 27 हजार 603 किमी इतकी होती. या संपूर्ण प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ट्रान्सल्यूसर इंजेक्शन असं म्हटलं जातं.
ट्रान्सल्यूसर इंजेक्शन या प्रक्रियेसाठी इस्रोच्या बंगळुरू येथे असणाऱ्या मुख्यालयातून शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचं इंजिन सुरु केलं होतं. पृथ्वीपासून हे यान 236 किमी अंतरावर असतानाच ही फायरिंग करण्यात आली. या चांद्रयानामध्ये लँडर, रोवर आणि प्रोपल्शन मोड्यूल असून, लँडर आणि रोवर चद्राच्या दक्षिम ध्रुवावर उतरणार आहेत. जिथं ते 14 दिवस सक्रिय राहतील. तर, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्याच कक्षेत राहून पृथ्वीपासून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठावर भूकंप नेमके कसे येतात यासह तिथली माती नेमकी कशी आहे याबाबतचा अभ्यास इस्रो करणार आहे.