नवी दिल्ली : भारत आज रात्री उशीरा अंतराळ क्षेत्रात नवे शिखर रचणार आहे. २२ जुलैला भारतीय अंतराळ अनुसंधान संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान-२ चे यशस्वी उड्डाण केले. ७ सप्टेंबरला १.३० ते २.३० च्या दरम्यान विक्रम नावाचे लॅंडर चंद्रावर उतरवले जाणार आहे. हे शोध यान चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरुन शोधकार्य करेल. यासोबतच भारत एक नवा इतिहास रचणार आहे. या ठिकाणी प्रज्ञान नावाचे रोबोटिक यान देखील उतरणार आहे. मॅजिनस सी आणि सिंपेलियस या दोन खड्ड्यांच्यामध्ये यातील लॅंडर विक्रम उतरणार आहे.
चांद्रयान २ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान उतरणार आहेत. लॅंडर विक्रमचे वजन १,४७१ किलोग्राम आहे. वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन विक्रमचे नामकरण करण्यात आले आहे. चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबर असतो.
विक्रम सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५ किलोमिटर अंतारवर भ्रमण करत आहे. यावेळी विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यातून पज्ञान पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास हे रोव्हर वेगळे होईल. असं इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे. याचं थेट प्रक्षेपण आपल्याला झी २४ तासवर पाहायला मिळणार आहे.
चांद्रयान-२ची मोहीम ही भारतासाठी अत्यंत गौरवास्पद कामगिरी ठरणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा चंद्रावर स्वत:चे यान उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.