मुंबई : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सगळेच पक्ष यासाठी कामाला लागले आहेत. पंतप्रधान मोदींनी कडवं आव्हान कोण देणार यासाठी देशात चर्चा रंगल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे भाजपकडून 2019 चे पंतप्रधानपदाचे उमेदवार असले तरी विरोधकांनी त्यांचा उमेदवार अजून निश्चित केलेला नाही. राहुल गांधी यांचं काँग्रेसकडून पुढं केलं जात असलं तरी इतर विरोधी पक्षाला ते मान्य नाही. त्यातच आता आणखी एक नाव यात चर्चेत आलं आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. नायडू पंतप्रधान मोदींच्या विरोधात मोठी युती करण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ममता बॅनर्जी य़ा देखील पंतप्रधान मोदींच्या विरोधात नेहमी बोलत असतात.
चंद्रबाबू नायडू कोलकातामध्ये 19 जानेवारीला ममता बॅनर्जी यांच्या रॅलीमध्ये देखील सहभागी होणार आहेत. चंद्रबाबू नायडू एचडी देवगौडा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची देखील त्यांनी याआधी भेट घेतली आहे. याआधी देखील सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण विरोधक यात यशस्वी झालेले नाहीत. पण नायडू ज्याप्रकारे विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे त्य़ामुळे ते विरोधकांचं नेतृत्व करु शकतील अशी देखील चर्चा आहे.
राहुल किंवा अन्य नेत्यांच्या तुलनेत चंद्रबाबू नायडू पंतप्रधान मोदींच्या विरोधात इतर पक्षांना एकत्र करण्यासाठी अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यांचं नेतृत्व देखील चांगलं आहे. 68 वर्षाचे नायडू राजकारणात ममता, मायावती किंवा अखिलेश यांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरतात. दक्षिण भागात देखील त्यांना प्रभाव चांगला आहे. दक्षिण भागात भाजप कमजोर असल्याने त्याचा फायदा नायडूंना होऊ शकतो.
चंद्रबाबू नायडू हे मायावती आणि अखिलेश यादव यांच्याप्रमाणे जातीच्या मुद्द्यावर वरचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना प्रशासनाचा देखील चांगला अनुभव आहे. त्यामुळे इतर पक्षाच्या अध्यक्षांपेक्षा ते अधिक अनुभवी आहेत. नायडू यांच्या नेतृत्वामुळे बदल होऊ शकतो. विरोधक राहुल गांधी यांच्या नेतृत्वा पेक्षा चंद्रबाबू नायडू यांना आपली पंसती देऊ शकतात. दक्षिण भागात इतर नेत्यांपेक्षा अधिक प्रभाव, राजकीय अनुभव आणि नेतृत्व यामुळे चंद्रबाबू नायडू जर पंतप्रधान मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले तर आश्चर्य वाटायला नको.