Chandigarh University: 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा Video Viral, 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न!

Chandigarh University Video : चंदीगड युनिव्हर्सिटीत मुलींच्या वसतिगृहातील एका मुलीने आंघोळ करताना इतर 60 मुलींचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याचा आरोप आहे. 

Updated: Sep 18, 2022, 09:13 AM IST
Chandigarh University: 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा Video Viral, 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न!  title=

Chandigarh University Girls Protest: पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीनं (Girl) आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील (Girls Hostel) 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. परिणामी पंजाबच्या मोहालीतील (Punjab Mohali) एका विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली. 

चंदीगडच्या एका खासगी विद्यापीठात शनिवारी दुपारी अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. गर्ल्स वसतिगृहातील एका मुलीने आंघोळ करताना इतर 60 मुलींचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याचा आरोप आहे. मुलांनी तो व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. रिपोर्ट्सनुसार, गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींचा बराच वेळ अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला जात होता.

हे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापन त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन केले. 
  
8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला

आंघोळ करताना विद्यार्थ्याने 60 मुलींचा व्हिडिओ (Video) बनवला आणि हा व्हिडिओ एका तरुणाला पाठवला. तरुणाने विद्यार्थिनींना अंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) केला. त्यानंतर 8 विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यापीठाच्या गेट क्रमांक 2 वर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला असून शेकडो विद्यार्थी इथं जमून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, पोलिस आल्यानंतर व कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थिनी शांत झाल्या. 

चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ

मोहालीतील चंदीगड विद्यापीठात (Chandigarh University) शनिवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. रात्री अडीचच्या सुमारास अनेक मुलींनी इथं पोहोचून निदर्शनं केली. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. ही विद्यार्थिनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आलीय.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

तरुणींचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल (viral) करणारा तरुण शिमलाचा ​रहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका खासगी विद्यापीठातील मुलींच्या बाथरूममधून व्हिडिओ (video) बनवताना आरोपी तरुणीला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याचा व्हिडिओ विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने यूट्यूबवर पोस्ट केला आहे.