मोठी बातमी! BBC Documentary मधून PM मोदींवर आरोप झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने ट्विटर (Twitter) आणि युट्यूबला (Youtube) बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या माहितीपटाशी संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. याआधी केंद्राने हा माहितीपट मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं होतं. या माहितीपटात 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.  

Updated: Jan 21, 2023, 05:11 PM IST
मोठी बातमी! BBC Documentary मधून PM मोदींवर आरोप झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय title=

Centre Blocks Tweets over BBC Documentary: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने(BBC ) तयार केलेल्या माहितीपटावरुन (Documentry) वाद निर्माण झाला असताना केंद्राने आता मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ट्विटर (Twitter) आणि युट्यूबला (Youtube) माहितीपटाशी संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. याआधी केंद्राने हा माहितीपट मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं होतं. या माहितीपटात 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. 

या माहितीपटाशी संबंधित अनेक व्हिडीओ आणि ट्वीट मायक्रोब्लॉगिंग आणि व्हिडीओ शेअरिंग वेबसाईटवरुन गायब झाले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (The Information and Broadcasting Ministry) माहितीपटाशी संबंधित पहिला भाग ब्लॉक करण्याचा आदेश दिल्याची माहिती घडामोडीशी परिचित लोकांनी सांगितलं आहे. नुकतंच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खासदाराच्या प्रश्नावर उत्तर देताना आपण सहमत नसल्याचं स्पष्ट करत फटाकरलं होतं. त्यानंतर लगेचच केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

 पंतप्रधान मोदींवरील BBC Documentary वर भाष्य करणाऱ्या खासदाराला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी झापलं

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरला एकूण 50 ट्वीट काढून टाकण्यास सांगितलं आहे. ज्यांचे ट्वीट काढून टाकण्यात आले आहेत त्यांच्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन यांचाही समावेश आहे. 

"सेन्सॉरशिप. ट्विटरने बीबीसी माहितीपटावर मी केलेलं ट्वीट काढून टाकलं आहे. त्याला लाखो व्ह्यू होते. एक तासाच्या या माहितीपटात पंतप्रधान अल्पसंख्यांकांचा द्वेष करत होते उघड करण्यात आलं होतं," असं डेरेक ओब्रियन म्हणाले आहेत.
 
माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत माहिती मंत्रालयाने लिंक्स काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. YouTube आणि ट्विटर या दोघांनीही या आदेशाचे पालन करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. केंद्राने जर कोणी नव्याने लिंक शेअर केल्या तर त्यादेखील काढून टाका असा आदेश ट्विटर आणि युट्यूबला दिला आहे.