माहेरी गेलेली पत्नी घरी येत नसल्याने पतीने आपलं गुप्तांग कापून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमध्ये हा प्रकार घडला आहे. माधेपुरा पोलीस स्टेशनच्या अख्त्यारित शुक्रवारी रात्री या घटनेची नोंद झाली. पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
कृष्णा बासुकी असं या 25 वर्ष पतीचं नाव आहे. कृष्णाचं अनिताशी लग्न झालं होतं. त्यांना चार मुलं आहेत. यामध्ये तीन मुली आणि एक मुलगा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कृष्णा पंजाबमधील मंडी येथे राहतो. दोन महिन्यांपूर्वी रजनी नयानगरमध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो आला होता.
त्याची पत्नी माहेरी गेली होती. मात्र ती माहेरहून परत येण्यास उशीर करत होती. ज्यामुळे कृष्णा संतापला आणि त्याने धारदार शस्त्राने आपलं गुप्तांग कापून घेतलं. नातेवाईकांनी कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेलं. काहींनी कृष्णाची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
कृष्णाला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.