Cooking oil : खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Edible Oil : खाद्यतेलाच्या (Cooking oil) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Feb 11, 2022, 01:19 PM IST
Cooking oil : खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय title=

नवी दिल्ली : Edible Oil : खाद्यतेलाच्या (Cooking oil) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. तेलबियांच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्याच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. (Central Government's decision to control edible oil prices)

केंद्र सरकारने 11 सप्टेंबर, 2021 पासून खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (reduce import duty on edible oils) सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क 5.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिवांनी शुक्रवारी या विषयावर राज्य अधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आवाक्यात राहणार आहेत.

केंद्राने राज्याला 3 फेब्रुवारीला तेलबियांच्या साठ्याची मर्यादा तीन महिन्यांनी म्हणजेच 30 जूनपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला होता. मात्र आदेशाची अंमलबजावणी करताना पुरवठा साखळी आणि व्यवसायात कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. या निर्णयामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

खाद्यतेलाच्याबाबतीत, किरकोळ विक्रेत्यांसाठी साठवण मर्यादा 30 क्विंटल आहे. ही मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 500 क्विंटल, रिटेलरसाठी 30 क्विंटल आणि त्यांच्या डेपोसाठी 1,000 क्विंटल आहे. खाद्यतेलावर प्रक्रिया करणारे त्यांच्या साठवण क्षमतेच्या 90 दिवसांपर्यंतचा साठा ठेवू शकतात.