यावर्षी इतका उकाडा आहे की, रात्रीच्या वेळी एसी किंवा कूलर लावल्याशिवाय अनेकांना झोपच येत नाही. पण आता मात्र रात्रीच्या वेळी एसी किंवा कूलरचा वापर केल्यास जास्त वीज वापरल्यामुळे तुमच्या खिशावर भार पडणार आहे. भारत सरकारने वीज (ग्राहकांचे हक्क) नियम 2020 मध्ये सुधारणा केली असून प्रचलित वीज दर प्रणालीमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल करण्यामागे मुख्यत्वे दोन हेतू आहेत. एक म्हणजे टाइम ऑफ डे (ToD) वीजदर आणणं आणि स्मार्ट मीटरिंग पद्धत अवलंबणं.
द 'टाइम ऑफ डे' दरप्रणाली दिवसा आणि रात्री होणाऱ्या वीजेच्या वापरासाठी वेगवेगळा दर आकारतं. वीजमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण दिवसभरासाठी एकाच दराने वीज आकारण्याऐवजी, "दिवसातील वेळेनुसार त्यासाठी दर आकारला जाईल. 'टाइम ऑफ डे' दरप्रणाली अंतर्गत सौर तासांमध्ये (राज्य विद्युत नियामक आयोगाने निर्दिष्ट केल्यानुसार दिवसातील आठ तासांचा कालावधी) दर सामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्के कमी असतील. तर जास्त मागणी असणाऱ्या वेळी ते 10 ते 20 टक्क्यांनी अधिक असतील".
याचाच अर्थ, दिवसा तुम्ही काही पैसे वाचवू शकता, परंतु रात्री तुमच्या खिशावर भार पडणार आहे. याचं कारण अनेक लोक रात्रीच्या वेळी एसीचा वापर करतात. यामुळे त्या काळात वीजेच्या मागणीत अचानक वाढ होते. यामुळेच सरकार 'टाइम ऑफ द डे' दरप्रणाली आणली आहे. पण ज्या घरांमध्ये दिवसा आणि रात्री एसी किंवा कुलरचा समान वापर होतो त्यांना मात्र फरक पडणार नाही. कारण त्यांचा दिवसा आणि रात्रीचा वीजेचा वापर समान असतो.
1 एप्रिल 2024 पासून 10 KW आणि त्यापेक्षा जास्त मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी TOD दरप्रणालू लागू होणार आहे. तसंच शेतकरी वगळता घरगुती ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2025 पासून हे नवे वीजदर लागू होतील. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर संबंधित ग्राहकांसाठी नवे वीजदर लागू केले जातील अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान सरकारसाठी मात्र दोन्ही बाजूंनी फायदा होणार आहे. "लोकांमध्ये होणारी जागरुकता आणि टाइम ऑफ डे दरप्रणालीमुळे ग्राहक आपलं वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतील. तसंच सौरऊर्जा स्वस्त असल्याने सौर तासांमध्ये दर कमी असतील, ज्याचा फायदा ग्राहकांना होईल. सौर तास नसतील तेव्हा थर्मल आणि हायड्रोपावर यासह गॅसवरील ऊर्जेचा वापर केला जाईल. याचा दर सौरऊर्जेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे टाइम ऑफ दे दरप्राणीलत फायदा होईल. ग्राहक आता वीजदराच्या आधारे तिचा वापर कसा आणि किती करावा हे ठरवू शकतील. म्हणजे सौर तासांमध्ये ते अधिक गोष्टींना प्राधान्य देतील," असं केंद्रीय ऊर्जा आणि मंत्री आर के सिंग यांनी सांगितलं आहे.
सध्याच्या जुन्या मीटरची जागा स्मार्ट मीटर्सनी घेतल्यानंतरच हे नवे 'टाइम ऑफ डे' दर लागू होणार आहेत. "सरकारने स्मार्ट मीटरिंगचे नियमही सोपे केले आहेत. ग्राहकांची गैरसोय/छळ टाळण्यासाठी ग्राहकांच्या मागणीत मंजूर मर्यादेपेक्षा जास्त वापर होत असल्यास आकारण्यात येणारा दंडही कमी करण्यात आला आहे अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
दिवसातून किमान एकदा स्मार्ट मीटरची पाहणी होईल आणि तो डेटा ग्राहकासह शेअर केला जाईल. जेणेकरुन त्यांना आपण किती वीज वापरत आहोत याची माहिती मिळेल. याचा अर्थ ग्राहकाला दिवसा आणि रात्रीच्या वीज वापराचे तपशील मिळतील जेणेकरुन ते त्यांच्या उर्जेचा वापर कमी किंवा वाढवू शकतील.