एका महिन्यात पाकिस्तानकडून २७२ वेळा सीमारेषेचे उल्लंघन

 पाकिस्तानतर्फे बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमाराम सीमारेषेचे उल्लंघन

Updated: Aug 21, 2019, 07:58 PM IST
एका महिन्यात पाकिस्तानकडून २७२ वेळा सीमारेषेचे उल्लंघन  title=

नवी दिल्ली : काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर नेण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानतर्फे बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमाराम सीमारेषेचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्याच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये सीजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवाया अद्यापही सुरु असल्याचे यातून स्पष्ट होत असून भारतातर्फे याला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. याआधी गुरुवारी पाकिस्तानने काश्मीरच्या उरी, राजौरी आणि केजी सेक्टरमध्ये सीमारेषेचे उल्लंघन केले आणि गोळाबार केला. भारताने दिलेल्या उत्तरात त्यांचे ४ जवान मारले गेले. 

भारताने पाकिस्तानचे काही बंकर देखील उध्वस्त केले. फायरिंगच्या आडून पाकिस्तानतर्फे घुसखोर सोडण्याचा प्रयत्न सुरु होता. पाकिस्तानतर्फे एलओसीवर राजौरी पासून उरी पर्यंत दिवसभर सीमारेषेचे उल्लंघन सुरुच होते. संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान उल्लंघन करत गोळीबार सुरु होता.