नवी दिल्ली : रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेली शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन ऑलआऊट' आता पुन्हा एकदा सुरु होणार आहे.
शस्त्रसंधीच्या काळात भारतीय सैन्यावर ग्रेनेड हल्ले वाढले. तसेच दहशतवाद्यांच्या कारवायांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ईदनंतर शस्त्रसंधी मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शस्त्रसंधी मागे घेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.