सीबीएसईच्या पेपरफुटी प्रकरणी आरोपी अटकेत

पेपरफुटी प्रकरणात या तिघांचा हात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

Jaywant Patil Updated: Apr 1, 2018, 11:11 PM IST
सीबीएसईच्या पेपरफुटी प्रकरणी आरोपी अटकेत title=

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या पेपरफुटी प्रकरणी, दिल्ली पोलिसांनी दोन शिक्षक आणि कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणा-या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. ऋषभ आणि रोहित अशी या शिक्षकांची नावं आहेत. तर कोचिंग क्लासमध्ये शिकवणा-या तरुणाचं नाव तौकिर असं आहे. पेपरफुटी प्रकरणात या तिघांचा हात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. 

क्राइम ब्रँचकडून चौकशी

या पेपरफुटी प्रकरणात क्राईम ब्रांचने कारवाईला सुरुवात केली आहे. तीन शाळांचे मुख्याध्यापक आणि 6 शिक्षकांची शनिवारी क्राइम ब्रँचनं चौकशी केली. या सर्व शिक्षकांवर प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर लीक केल्याचा आरोप आहे.