नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातील महागाईचा भडका देणारी दुसरी बातमी हाती आलेय. पेट्रोल-डिझेलचा गेल्या चार वर्षात उच्चांकी भडका उडाल्यानंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झालेय. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
गॅस सिलिंडरच्या पाईप नॉचरल गॅस (पीएनजी) आणि सीएनजीच्या दारात वाढ झालेय. दिल्ली आणि एनसीआरवासीयांना पीएनजी २५.९९ रुपये प्रति युनिट (एससीएम) मिळत होते. यात १.१५ रुपये प्रति एससीएमची वाढ करण्यात आलेय. त्यामुळे किंमत वाढ झालेय. २७.१४ रुपये नवे दर असणार आहेत. तर एनसीआर म्हणजेच नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पीएनजीच्या दरात वाढ होऊन २८.८४ रुपये प्रति युनिट झाले आहेत.
गैस कंपनीने सीएनजीच्या दरात ९० पैसे ते १ रुपया प्रति किलो ग्रॅम वाढ केलेय. दिल्लीत सीएनजीचे दर ९० पैशांनी वाढून ४०.६१ रुपये प्रति किजी झालाय. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये एक रुपया वाढ झाली असून ४७.०५ रुपये किलो झालेत.
दरम्यान, सीएनजीच्या दरात वाढ होऊनही आयजीएलने सीएनजी आऊटलेट वर दुपारी १२.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत गॅस भरणाऱ्यांना देण्यात येणारी सूट कायम ठेवलीआहे. या वेळेत गॅस भरणाऱ्यांना १.५० रुपये किलोला सुट मिळणार आहे. ही सूट वजा करुन दिल्लीत सीएनजी ३९.११ रुपये तर गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये ४५.५५ रुपये किलो दराने गॅस मिळेल.