Education News : परीक्षेच्या काळात अनेकदा पुस्तक पुढ्यात ठेवून त्यातून घोकंपट्टी करणारे अनेकजण नजरेत पडतात. अभ्यासक्रमातील अनेक विषय किंवा संकल्पना लक्षात आल्या नाहीत तरी, या विषयांचं कसंबसं पाठांतर करून, स्पष्ट म्हणावं तर रट्टा मारून मग उत्तर पत्रिकेत पानंच्या पानं भरली जातात. पण, उत्तर लिहित असताना त्यातील किती भाग विद्यार्थ्यांना खरंच उमगला आहे हासुद्धा एक प्रश्नच. विद्यार्थ्यांची हीच सवय मोडण्यासाठी आता एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) (Central Board of Secondary Education CBSE) च्या माध्यमातून 11 वी आणि 12 वी इयत्तांच्या अभ्यासक्रमाची शैली काही प्रमाणात बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष जीवनातील गोष्टींशी मेळ साधत त्या संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी अधिक भर देत अभ्यासाठी त्या संकल्पना जोडण्याच्या या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल होणार आहेत.
शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णानुसार परीक्षेतून दीर्घोत्तरी प्रश्न अर्थात मोठी, सविस्तर उत्तरं असणारे प्रश्न हटवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमधील घोकंपट्टीची सवय दूर करणं आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढवणं या मुख्य हेतूनं हा बदल करण्यात आला आहे. या प्रश्नांच्या जागी वैकल्पीक प्रश्न किंवा विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारीत प्रश्न विचारले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अभ्यास म्हटलं की पुस्तक, पुस्तर म्हटकी की पाठांतर हे समीकरण आता बदलण्याची अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणातून व्यक्त करण्यात आली आहे. ज्यानंतर सीबीएसईकडून परिणामकारक पावलं उचलच तसे बदलही करण्यात आले आहेत. त्यानुसार आता सीबीएसईने परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत. पाठांतराव्यतिरिक्त इतर नव्या धाटणीचे प्रश्न परीक्षेत अधिकाधिक प्रमाणात विचारले जाणार असून, लघू आणि दीर्घोत्तरी प्रश्न 30 ते 40 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षासाठी अर्थात 2024- 25 मध्ये ही पद्धत लागू करण्यात येईल.
शैक्षणिक वर्षादरम्यान पुस्तकी ज्ञानाची घोकंपट्टी करून परीक्षा देण्याऐवजी शिकलेल्या आणि आकलनात आलेल्या संकल्पनांचा, विविध प्रसंगांचा विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी कसा वापर करता येतो त्याची पडताळणी परीक्षेच्या या अनोख्य़ा प्रकारातून करता येणार आहे. परिणामी प्रश्नपत्रिकांमध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूपही बदलण्यात येणार असून त्यामध्ये (MCQs) बहुपर्यायी प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे.