कोची : गेल्या आठवड्यातचं CBSE परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर अनेक विद्यार्थ्याच्या यशाच्या स्टोरीस समोर येत आहेत. त्यात आता एका नेत्रहीन तरूणीच्या सक्सेस स्टोरी समोर आली आहे. या नेत्रहीन तरूणींचे गुण पाहून तुमचेही डोळे विस्फारतील, इतकं घवघवीत यश या तरूणीने CBSE परीक्षेत मिळवले आहे.
कोची येथील हन्नाह एलिस सायमन या विद्यार्थिनीने बारावीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेत मोठं यश संपादन केले आहे. या परीक्षेत हन्नाह सायमनने 500 पैकी 496 गुण मिळवले आहेत. पैकीच्य़ा पैकी गुणांपासून अवघ्या 4 मार्काने ती हुकली.मात्र इतके मार्क मिळवून तिने अपंग श्रेणीत टॉपचा क्रमांक पटकावला आहे.
हन्नाह हीने कक्कनड येथील राजगिरी ख्रिस्तू जयंती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे ती एका अपंग शाळेत नव्हे तर सर्वसाधारण विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात,त्या शाळेत शिकली आहे. यासाठी तिच्या पालकांचाच आग्रह होता.
'मायक्रोफ्थाल्मिया' या मूळ स्थितीमुळे हन्नाहने तिचे डोळे गमावले होते.नेत्रहीण स्थितीत तिने सर्व अडचणींवर मात करत CBSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या यशाने तिने देशातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
मल्टीटॅलेंटेड
हन्नाहने एक मोटिव्हेशनल स्पीकर, सिंगर आणि यूट्यूबर आहे. तिने १५ जुलै रोजी 'वेलकम होम' नावाचे पुस्तकही प्रकाशित केले होते. ज्यात लहान मुलींच्या सहा लघुकथा आहेत.
हन्नाह पुढे म्हणाली की, 'मला अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण देण्याऐवजी माझ्या पालकांनी मला सामान्य शाळेत प्रवेश देण्याचा विचार केला जेणेकरून कॉलेजमध्ये पुढील अभ्यासासाठी मला कोणतीही अडचण येऊ नये.' तिने हेही आवर्जून सांगितले की, शाळेत तिला चिडवलं गेलं, तरी या गोष्टीवर लक्ष न देता तिने घवघवीत यश मिळवलं. तिचे हे घवघवीत यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.