Cash Limit At Home Income Tax Rule: अचानक पैसे लागले तर असा विचार करुन घरात नगद (कॅश) (Cash At Home) ठेवण्याची परंपरा भारतात फार जुनी आहे. बँकांकडून (Banks) वेगवेगळ्या ऑफर्स, (Bank Offers) आकर्षक व्याजदर (Bank Intrest Rates) आणि सेवा दिल्या तरी 'अचानक पैसे लागले तर घरात असू द्यावेत थोडे' असा विचार करत घरात कॅश ठेवणाऱ्यांची संख्या आजही भारतात (India) फार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र घरात किती कॅश ठेऊ शकतो (Cash Limit At Home) यासंदर्भात काही नियम आहे का? इन्कम टॅक्सची (Income Tax Raid) धाड पडते म्हणजे नेमकं काय होतं? एका ठराविक रक्कमनेनंतर अधिक रक्कम घरात ठेवण्यासंदर्भात तुम्हाला आयकर विभागाला (Income Tax Deparment) माहिती द्यावी लागते का? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेऊयात...
घरात किती कॅश किती ठेवता येते यावर काही बंधन आहेत का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. घरामध्ये वाटेल तितकी कॅश ठेवता येते. तसेच यासंदर्भात आयकर विभागाला माहिती देण्यासंदर्भात कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. म्हणजेच घरात जास्त कॅश असेल तर आयकर विभागाला कळवण्याची गरज नाही. मात्र घरात ठेवलेल्या या रक्कमचा स्त्रोत म्हणजेच इनकम सोर्स काय आहे यासंदर्भातील माहिती आणि कागदपत्रं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजेच घरात असलेली कॅश कोणत्या माध्यमातून आली याबद्दलचे पुरावे कॅश बाळगणाऱ्यांकडे असणं आवश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या प्रमाणात नगदी नोटा म्हणजेच कॅश असेल आणि या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला तर छापेमारी करणारे अधिकारी या मिळकतीसंदर्भातील पुरावे मागतात. सामान्यपणे आयकर छापेमारीमध्ये घरातील कॅश किंवा मौल्यवान वस्तू आणि त्यासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रांचीच चाचपणी केली जाते.
घरातील पैसे हे करपात्र उत्पन्नामधील असतील तर कर भरलेला असणं बंधनकारक आहे. घरातील पैशांच्या कमाईचा स्त्रोत किंवा कर भरल्यासंदर्भातील कागदोपत्री दस्तावेज नसतील तर संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई होऊ शकते. केवळ आयकर विभागच नाही तर सक्तवसुली संचलनालय (ईडी) (ED), केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) (CBI) सुद्धा अशा व्यक्तींची चौकशी करु शकतात. मात्र घरातील सर्व कॅशसंदर्भातील कागदोपत्री पुरावे असतील तर घाबरण्याची काहीच गरज नाही.
आयकर विभागाने छापेमारी केली आणि घरातील रक्कमेसंदर्भातील सोर्स काय आहे याबद्दलची माहिती विचारली असता ती देणं बंधनकारक असतं. या रक्कमेसंदर्भातील योग्य कागदपत्रं दाखवली नाही किंवा कागदपत्रं अपुरी असतील अथवा नसतील तर मोठा दंड आकारला जातो. आयकरसंदर्भातील कायद्यानुसार घरामध्ये जितकी कॅश सापडले त्याच्या 137 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागते. म्हणजेच जेवढी बेनामी कॅश सापडली आहे ती आणि त्यावर 37 टक्के कर भरणे बंधनकारक असतं.