कोविड रुग्णालयात तरूणीचा विनयभंग; संक्रमित डॉक्टरवर आरोप

डॉक्टरविरोधात भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.    

Updated: Jul 28, 2020, 05:40 PM IST
कोविड रुग्णालयात तरूणीचा विनयभंग; संक्रमित डॉक्टरवर आरोप title=

नवी दिल्ली : कोविड रुग्णालयांमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. कोविड रुग्णालयात दिल्ली विद्यापीठाच्या  (Delhi University) विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची खळबळजनक बाब समोर येत आहे. ताजी घटना दिल्लीला लागून असलेल्या नोएडामधील जेपी रुग्णालयातील आहे. एका तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी  संक्रमित डॉक्टरवर आरोप दाखल करण्यात आला आहे. 

संबंधीत तरूणीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान बाजूच्याच बेडवर दाखल असलेल्या ३५ वर्षीय डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यामुळे बहरहाल पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सांगण्यात येत आहे की, २० जुलै रोजी तरूणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर २३ जुलै रोजी संक्रमित डॉक्टर अमृत गोयलला देखील उपचारासाठी त्याच वार्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तरूणीने आरोप केल्यानंतर डॉक्टरला दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. 

डॉक्टरवर कोरोनाचे उपचार सुरू असल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र डॉक्टरची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.