Cardamom Farming: वेलची लागवड करुन लाखोंची कमाई, पाहा कुठे करावी लागवड

वेलची लागवड करुन लाखो रुपयांचा नफा कमवा.

पोपट पिटेकर | Updated: Oct 29, 2022, 11:33 PM IST
Cardamom Farming: वेलची लागवड करुन लाखोंची कमाई, पाहा कुठे करावी लागवड title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : वेलची हे पीक मूळचं भारतातलं (Cardamom Farming). भारताबाहेर वेलचीची लागवड ग्वोतेमाला, टान्झानिया, श्रीलंका, व्हीयेतनाम, लाओस, कंबोडिया (Guatemala, Tanzania, Sri Lanka, Vietnam, Laos, Cambodia) ह्या देशातही केली जाते. जगातील 40% उत्पादन ग्वोतेमाला (Guatemala) ह्या देशांत होतो. वेलची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. त्याची लागवड फक्त त्या राज्यांमध्येच योग्य आहे, जिथे वर्षभरात 1500-4000 मिमी पाऊस पडतो. भारतात केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये (Kerala, Karnataka Tamil Nadu) वेलचीची (Cardamom) लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

वेलची लागवडीसाठी माती  

वेलचीची पिके 10-35 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगली वाढतात. (Soil for cultivation of cardamom) यासाठी काळी चिकणमाती (Black clay) उत्तम मानली जाते. तसेच पाण्याचा चांगला निचरा असलेल्या काळ्या जमिनीवरही (Black lands) याची लागवड करता येते.

वेलचीची पेरणी आणि कापणी

शेतात वेलची रोपे लावण्यापूर्वी ती रोपवाटिकेत तयार केली जाते. (Sowing and harvesting of cardamom) एक हेक्टरमध्ये रोपवाटिका तयार करण्यासाठी एक किलो वेलची (One kilo of cardamom) बियाणे पुरेसे आहे. रोपे लावल्यानंतर दोन वर्षांनी फळ देण्यास सुरुवात होते. फळ सेट झाल्यानंतर दर 15-25 दिवसांनी काढणी केली जाते.

वेलचीतून मोठा नफा

वेलचीचा वापर अन्न, मिठाई, पेये (Food, sweets, drinks) बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे बाजारात वेलचीची मागणी खुप असते. त्याची विक्री देखील लगेच होते. तुम्हाला हेक्टरी 140 ते 150 किलो वेलचीचे उत्पादन मिळू शकतो. बाजारात वेलचीची किंमत 1100 ते 2000 हजार रुपये प्रतिकिलो आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला एका हेक्टरमध्ये वार्षिक 3 लाखांपर्यंतचा नफा (Profit upto 3 Lakhs per annum) सहज मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही जेवढे मोठे क्षेत्र पिकवेल, तेवढा नफा मोठ्या (The larger the area cultivated, the greater the profit) प्रमाणात कमवाल.