Cake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा

ग्लुटेन फ्री केकची (glutten free cake) सर्वात सोपी रेसिपी आणि मुख्य म्हणजे हा केक बनणार आहे चक्क बेसनाच्या पिठापासून आणि खाताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि यात बेसन घातलाय कि मैदा... 

Updated: Dec 3, 2022, 02:07 PM IST
Cake making : ग्लुटनफ्री, एगलेस पण बेसनाचे कप केक घरी नक्की बनवून पाहा title=

cake making recipe:  केक बनवताना काही बेसिक साहित्य गरजेचं असत जस कि,  (egg)अंड , मैदा, पिठी साखर, बटर ,बेकिंग सोडा (baking soda)  वैगेरे...पण मैद्यापासून किंवा गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन (glutten) असत जे आपली शरीरासाठी हानिकारक असत,, काहीजण असेही असतात, ज्यांना ग्लुटेनफ्री खान पसंत करतात.. पण मागमैद्याशिवाय केक कसा बनवायचा किनवट अशक्यच आहे असं आपल्याला वाटत ना पण आजच्या कुकिंग टिप्स (cooking tips) मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत,

ग्लुटेन फ्री केकची (glutten free cake) सर्वात सोपी रेसिपी आणि मुख्य म्हणजे हा केक बनणार आहे चक्क बेसनाच्या पिठापासून आणि खाताना तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि यात बेसन घातलाय कि मैदा... 
चला मग जाणून घेऊया , शेफ विकास (chef) ने सांगितलेली बेसनाच्या पीठापासूनची यम्मी कप केक ची रेसिपी...  (besan cup cake recipe)
  

साहित्य 

* पिठी साखर-  3/4  कप किंवा १७० ग्राम  cup or 170gm
* बटर  – 1/2 कप  किंवा ८० ग्राम cup or 80gm
* दही- 1 कप किंवा २५० मिली 
*बेसन-   1½ कप किंवा 180 ग्राम  or 180gm
* बेकिंग पावडर -  1¼ चमचा  tsp
* बेकिंग सोडा - 1 मोठा चमचा 
* वेलची पावडर - चिमूटभर 
* वॅनिला इसेन्स - 1 चमचा 

कृती 

एका भांड्यात बटर आणि पिठी साखर व्यवस्थित फेटा जेणेकरून  ते मिश्रण फ्लफी होईल आणि रंग बदलून पेल व्हाईट दिसू लागेल. यांनतर त्यात थोडं दही घाला हे मिश्रण सतत हलवत राहा आणि लक्षात ठेवा तुम्हाला हे मिश्रण खूप वेळ फेटावीच नाहीये , हे फेटत असताना यात थोडासा  वॅनिला इसेन्स (vannila essense) घाला . 

आता एक वेगळं भांड घ्या, बेसनाचं पीठ , वेलची पावडर, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर हे सर्व एकत्र चाळून घ्या.  हे सर्व मिश्रण आधी फेटलेल्या मिश्रणामध्ये घाला व्यकस्थित एकजीव करून घ्या. 

बेकिंग ट्रे (baking tray) ला व्यवस्थित ग्रीस करून घ्या यांनतर काप केकच्या या ग्रीस केलेल्या भांड्यांमध्ये, प्रत्येकी 100 ग्राम प्रमाणे हे बॅटर ओता.180 डिगरीवर ओव्हन प्री हिट करून घ्या आता २०-२२ मिनिट बेक होऊद्या. 

यांनतर ट्रे बाहेर काढून घ्या, टूथपिकच्या मदतीने व्यवस्थित शिजलेत का हे एकदा पाहून घ्या, २-३ मिनिट थंड होऊद्या आता कूलिंग ट्रे मध्ये काढून घ्या,   

कप केक तयार आहेत. 

हे नेहमी लक्षात ठेवा कप केक व्यवस्थित थंड होऊद्या, आणि मगच त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करा, 

आहेत कि नाही खायला हेल्थी आणि ग्लूटेन फ्री कप केक!