Inspirational Story : तुमच्याजवळ जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. अशीच एक यशाची प्रेरणादायी कहानी (Success Story) समोर आली आहे. या कहानीत एका तरूणाने परीक्षेच्या तयारीच्या काळात वेबसीरीज (Web Series) पाहूण आणि वडिलांच्या दुकानावर चहा-कचोरी विकून देशातील सर्वात कठीण समजली जाणारी सीएची परीक्षा (CA Exam) पास केली. त्याच्या या यशाचे कुटूंबियांसह देशात कौतूक होत आहे.
वैभव माहेश्वरी या तरूणाने सीएची परीक्षा (CA Exam) पास केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या आलेल्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण देशभरातून 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाने कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच राज्यातून त्याच्यावर कौतूकाचा आणि अभिनंदनाता वर्षाव होतोय.
एकीकडे राज्यातले तरूण परीक्षा पास होत नसल्याने आत्महत्या करत असताना, दुसरीकडे वैभव माहेश्वरीने परीक्षेच्या काळात मस्त वेबसीरीज पाहून आणि वडिलांच्या दुकानावर चहा-कचोरी विकून सीएची परीक्षा (CA Exam)पास केली आहे. विशेष म्हणजे वैभवच्या या यशात त्याच्या कुटूंबियांचा मोलाचा वाटा आहे.कारण त्यांनी त्याच्यावर कधीही अभ्यासासाठी दबाव आणला नाही आणि वैभवला त्याचे स्वातंत्र्य दिले होते.
मी रोज 10 तास अभ्यास करायचो, पण अभ्यासाचा भार कधीही डोक्यावर घेतला नाही. कधी निराश झालो तर सोशल मीडियावर वेळ घालवायचो आणि ओटीटीवर वेब सीरिज पाहायचो असे वैभव माहेश्वरी याने न्यूज चॅनेलला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
आमचे चाय-कचोरीचे रेस्टॉरंट गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू आहे. अनेकवेळा वैभव इथे येऊन मदत करायचा, आज त्याची मेहनत रंगली आहे. आमचे संपूर्ण कुटुंब-समाज आणि राजस्थानला त्यांचा अभिमान असल्याचे वैभवचे वडील अरुण माहेश्वरी यांनी सांगितले. कोहिनूर हिरा बाहेर आला की सगळीकडे प्रकाश पसरतो. तसेच मुलगा वैभवने नाव लौकीक मिळवून दिले आहे,असे डान्स क्लासेस चालवणाऱ्या वैभवची आई प्रीती माहेश्वरी यांनी सांगितले आहे.
दरम्यान ही घटना राजस्थानची आहे. वैभव माहेश्वरी सीए परीक्षेत (CA Exam) राजस्थानमधून पहिला आला आहे. तर देशातून त्याने 10 वा क्रमांक पटकावला आहे. वैभवच्या या यशावर त्याच्या नातेवाईकांसह संपूर्ण राजस्थानमधून त्याचे कौतूक होत आहे. वैभव माहेश्वरीचे हे यश अनेक तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे अनेकांना त्याची कहाणी वाचून प्रेरणा मिळणार आहे.